MPSC मध्ये मराठा आरक्षण लागु; मराठा उमेदवारांना वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेता येणार

    10-May-2024
Total Views | 251
maratha mpsc
 
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ चे सुधारीत पत्रक जारी केले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यानंतर फेब्रुवारी महीन्यात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण लागु केले. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मराठा आरक्षणासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला. पण एमपीएससीने यापुर्वीच अनेक परीक्षांच्या जाहीराती काढलेल्या होत्या. परंतु आता या परीक्षांमध्ये मराठा आरक्षण लागु करण्यासाठी नविन पत्रक काढण्यात येणार आहे.
 
संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ चे सुधारीत पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू करण्यात आले आहे. यापुर्वी डीसेंबर २०२३ ला काढण्यात आलेल्या पत्रकांतील जागांपेक्षा २५० अधिकच्या जागांची वाढही करण्यात आली आहे. मराठा उमेदवारांना यामध्ये मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करता येणार आहे.
 
एमपीएससीने ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ व ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. नागरी सेवा परीक्षा २८ एप्रिल ला होणार होती. तर समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षा १९ मे राजी होणार होत्या.
यापैकी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही ६ जुलैला होणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121