महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम
मंडळाने "का" हटवले पुर्वीचे अध्यक्ष?
07-Mar-2024
Total Views | 82
मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जऱ्हाड अध्यक्षपदावर होते. बुधवार दि. ६ मार्च रोजी राज्य शासनाने हा अध्यादेश काढला असून पुर्वीच्या अध्यक्षांना या पदावरून हटविण्यात आले आहे.
नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष सिद्धेश कदम हे नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांना प्रदीर्घ काळ गैरहजर राहिल्याच्या कारणावरुन पदावरुन हटविण्यात आले आहे. कोणत्याही कारणाशिवाय आबासाहेब जऱ्हाड प्रदीर्घ काळ गैरहजर राहिले असून या कारणावरुन त्यांना पदावरुन हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.