मोदी सरकार आणणार काँग्रेसकालीन घोटाळ्यांवर 'हा ' नवा पेपर

काँग्रेसने विविध घोटाळे करत २०१४ ला भारताला आर्थिक संकटात आणल्याचा भाजपचा हल्लाबोल

    08-Feb-2024
Total Views |
Arjun Ram Meghwal 
 

मोदी सरकार आणणार काँग्रेसकालीन घोटाळ्यांवर 'हा ' नवा पेपर
 

काँग्रेसने विविध घोटाळे करत २०१४ ला भारताला आर्थिक संकटात आणल्याचा भाजपचा हल्लाबोल
 
प्रतिनिधी: मोदी सरकारने युपीए सरकारच्या कथित गैरव्यवहारांची पोलखोल करण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी काळात झालेला भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाने ठरवले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या निर्णयाची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांची प्रतिमा पारदर्शक असली तरी याकाळात मात्र अनेक मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे चर्चेत आली. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा ,चारा घोटाळा अशा घोटाळ्याने सरकारविरोधी वातावरणाची पार्श्वभूमी तयार झाली होती.
 
याचा परिपाक म्हणून २०१४ सारी भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अस्तित्वात येऊन पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. काँग्रेस व विरोधी पक्षांच्या विरूद्ध भ्रष्टाचाराची मोहिम उघडल्याचे संकेत पंतप्रधान यांनी बजेट सत्रात दिले होते. या धर्तीवर आता भाजपाने श्वेतपत्रिका काढणार असल्याचे जाहीर केले.
 
याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री व खासदार अर्जुन राम मेघवाल बोलताना म्हणाले, ' श्वेतपत्रिका ही आमच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा भाग होता‌. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात हे मुद्दे मांडले गेले होते. २०१४ मध्ये काँग्रेसने ज्या स्थितीत भारताला नेवून ठेवले होते ते जगासमोर आणण्याची गरज आहे. यासाठी श्वेतपत्रिकेवर चर्चा हा आमचा उद्देश आहे.'
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.