‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झेंडा, कमावले ‘इतके’ कोटी!
20-Feb-2024
Total Views | 95
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास सांगणारा ऐतिहासिक चित्रपट 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ४ दिवसांत समाधानकारक कमाई केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास वर्तमान आणि भविष्यातल्या पिढींना समजावा यासाठी दिग्पाल लांजेकर यांनी विडा उचलला आहे. दरम्यान, ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल ५.१२ कोटींची कमाई केली आहे.
'शिवरायांचा छावा' चित्रपटात अभिनेता भूषण पाटील यांनी छत्रपती संभाजी महाजांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री मृण्मयी कुलकर्णी यांनी जिजाऊंची आणि अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. याशिवाय, अभिनेत्री तृप्ती तोरडमल महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत तर अभिनेते समीर धर्माधिकारी औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. याबरोबरच विक्रम गायकवाड, रवी काळे, अभिजीत श्वेतचंद्र या कलाकरांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.