मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jitendranand Saraswati) वाराणसीच्या उदय प्रताप महाविद्यालयावर (यूपी कॉलेज) लखनौ स्थित यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने दावा ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याप्रकरणी काशीच्या संत समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इस्लामिक कट्टरपंथी आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढत असून काँग्रेसने धर्मांधांना दिलेली शस्त्रे आता त्यांनाच महागात पडणार आहेत, असे मत अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
हे वाचलंत का? : वाराणसीच्या ११५ वर्षे जुन्या उदय प्रताप कॉलेजवर वक्फ बोर्डाचा दावा
पुढे ते म्हणाले, उत्तर प्रदेशात एक लाख १३ हजार वक्फ मालमत्ता असल्याचे असदुद्दीन ओवैसी स्वत: मानतात, परंतु एक लाख नऊ हजारांची कुठलीच नोंद नाही. एकीकडे ते भगवान श्रीरामललांच्या जन्माचा पुरावा मागतात पण दुसरीकडे वक्फ बोर्डाची कागदपत्रे मागितली असता ते मौन पाळतात. वक्फला एवढ्या मालमत्ता कोठून मिळाल्या याचा पुरावा देण्यासाठी ओवेसी पुढे येत नाहीत. त्यांना फक्त हिंदूंचीच कागदपत्रे हवी आहेत." वक्फने पले दावे विचारपूर्वक मांडावेत अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल, असा इशारा स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी दिला आहे.