यशवंत नाट्य मंदिरात साजरा होणार जागतिक रंगकर्मी दिवस

    25-Nov-2024
Total Views |
        रंगभूमी         मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असणाऱ्या मराठी नाट्य कलाकार संघ आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ सोमवार २५ नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात मराठी नाट्य कलाकर संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार प्रदान केल्यानंतर मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत सुद्धा होणार आहे. मुलाखतकार विघ्नेश जोशी ही मुलाखत घेणार आहेत. ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सुद्धा या सोहळ्यात होणार आहे. गौतम कामत, धवल भागवत, मैत्रेयी नायक, तन्वी गोरे सुहास चितळे इत्यादि कलाकार त्यांना साथ देणार आहेत. रंगकर्मींनी आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आले आहे.