बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

Total Views |

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी हा सोळावा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यात असलेले सर्व पाचनदी पूल आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल बांधले जात आहेत. वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआरमार्ग दादरा आणि नगर हवेलीमधील 4.3 किमीसह सुमारे ५६ किमी लांबीचा आहे. हा मार्ग जारोली गावातून सुरू होतो आणि वाघलदरा गावात संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा बोगदा, ०५ नदी पूल आणि ०१ पीएससी पूल (२१० मीटर) समाविष्ट आहे.

नाशिकमध्ये सह्याद्रीत दमण गंगा नदीचा उगम

दमण गंगा नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वलवेरी गावाजवळील सह्याद्री टेकड्यांमधून उगम पावते. ती सुमारे १३१ किलोमीटर वाहते, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमणमधून जाते आणि नंतर अरबी समुद्रात मिळते. ही नदी पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. वापी, दादरा आणि सिल्वासा सारखी औद्योगिक शहरे तिच्या काठावर वसलेली आहेत. नदीवरील मधुबन धरण हा एक प्रमुख जलसंपदा प्रकल्प आहे जो गुजरात, डीएनएच आणि दमण आणि दीवला लाभ देतो, ज्यामुळे सिंचन, पाणीपुरवठा आणि वीज निर्मितीसाठी पाणी मिळते.

पूल बोईसर आणि वापी बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान

हा पूल बोईसर आणि वापी बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान आहे. या दोन्ही स्टेशन दरम्यान आधीच पूर्ण झालेला आणखी एक नदी पूल म्हणजे दारोठा नदी पूल आहे. ही नदी वापी बुलेट ट्रेन स्टेशनपासून सुमारे १ किमी आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनपासून ६१ किमी अंतरावर आहे. वलसाड जिल्ह्यात औरंगा (३२० मीटर), पार (३२० मीटर), कोलक (१६० मीटर) आणि दारोथा (८० मीटर) हे नदी पूल पूर्ण झाले आहेत.

नदीवरील पुलाची मुख्य वैशिष्ट्ये

- ⁠लांबी: ३६० मी

- प्रत्येकी ४० मीटरचे ⁠९ पूर्ण स्पॅन गर्डर

- ⁠पिअरची उंची - १९ मी ते २९ मी

- ४ मी लांबीचा एक पिअर

- ५ मी लांबीचा एक पिअर

- ५.५ मी व्यासाचे ०८ गोलाकार पियर

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121