भारतीय रेल्वेचे 'राउंड ट्रिप पॅकेज’ परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यात २० टक्के सूट १४ ऑगस्टपासून आरक्षण होणार सुरू

Total Views |

नवी दिल्ली, भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळातील वाढलेली गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या तसेच, विशेष गाड्यांसह दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी गाड्यांचा खात्रीशीर योग्य वापर करण्याच्या उद्देशाने "सणासुदीच्या गर्दीसाठी फेस्टिव्हल रश राउंड ट्रिप पॅकेज" या नावाने एक प्रायोगिक योजना सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना सूट दिलेल्या दरात फेरी प्रवासाची संधी मिळणार आहे.

ही सवलत केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा जाण्या-येण्याचे (दोन्ही बाजूंचे) तिकीट एकाच प्रवाशाच्या नावाने आरक्षित केले जाईल. परतीच्या प्रवासाचे प्रवाशाचे तपशील पाण्याच्या प्रवाससारखेच असतील.

दि.१४ ऑगस्ट २०२५पासून आरक्षण सुरू होईल. सर्वप्रथम जाण्याचे तिकीट दि.१३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालावधीत असलेल्या प्रवासासाठी आरक्षित करावे लागेल. नंतर कनेक्टिंग जर्नी फीचर वापरून १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत परतीचे तिकीट आरक्षित करता येईल. परतीच्या प्रवासाच्या आरक्षणासाठी आगाऊ आरक्षण कालावधी अट लागू होणार नाही. वर निर्देशित आरक्षण केवळ जाण्याच्या आणि येण्याच्या कन्फर्म तिकिटासाठी दिले जाईल. २० टक्के सवलत केवळ परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच मिळेल.

या योजनेअंतर्गत आरक्षण जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासात एकाच वर्गासाठी आणि समान ओ-डी जोडीसाठी असेल. या योजनेअंतर्गत आरक्षित केलेल्या तिकिटांचे भाडे परत केले जाणार नाही. या योजना फ्लेक्सी भाडे असलेल्या गाड्या वगळता सर्व वर्गांसाठी आणि विशेष गाड्यांसह सर्व गाड्यांसाठी (मागणीनुसार गाड्या) लागू असेल. दोन्ही प्रवासांच्या तिकिटावर कोणताही बदल करता येणार नाही. परतीच्या प्रवासाच्या तिकिटासाठी इतर कोणत्याही सवलती, रेल्वे प्रवास कूपन, व्हाउचर आधारित बुकिंग, पास किंवा पीटीओ इत्यादी लागू होणार नाहीत. इंटरनेट (ऑनलाइन) बुकिंग, किंवा आरक्षण केंद्रातून काउंटर बुकिंग जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे एकाच पद्धतीने आरक्षित केले गेले पाहिजे. या पीएनआरसाठी, चार्टिंग दरम्यान कोणत्याही कारणाने भाड्यात वाढ झाल्यास कोणतेही अतिरिक्त भाडे वसूल केले जाणार नाही.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.