पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही - सांताक्रूझ आणि माहीम स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

Total Views |

मुंबई, पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि माहीम स्थानकांदरम्यान दि.०९-१० ऑगस्टच्या मध्यरात्री रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवार,दि.१० ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार/रविवार म्हणजेच दि. ०९/१० ऑगस्टच्या मध्यरात्री सांताक्रूझ आणि माहीम स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत आणि डाऊन फास्ट मार्गावर रात्री साडेबारा ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व गाड्या अंधेरी आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. त्यानुसार, रविवार, १० ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसाचा ब्लॉक राहणार नाही.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.