दिवाळी पहाटसाठी ‘ठाणे’ सज्ज दिवाळीनिमित्त आज वाहतुकीत बदल.

    31-Oct-2024
Total Views |

traffic change

दीपावली सणानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी ’ठाणे’ सज्ज झाले आहे. (Traffic rule change in Thane) गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी मासुंदा तलाव परिसरात तसेच राममारुती रोड, गडकरी रंगायतन चौक येथे सामाजिक संस्थांच्यावतीने आठ दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यक्रम होणार असल्याने सामाजिक संस्थांचे या संदर्भातील परवानगीचे अर्ज नौपाडा पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसांनीही महत्त्वाचे वाहतूक बदल लागू केले आहेत. रविवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल होणार असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान,दिव्यांग बांधवांसाठी ‘डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन’च्यावतीने ’एक पहाट आपुलकीची’ साजरी करण्यात येणार आहे. तीवर्षी मासुंदा तलाव अर्थात तलावपाळी येथील गडकरी रंगायतन चौक, राम मारूती रोड, रंगो बापूजी चौकात शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने यंदा सामाजिक संस्थांच्यावतीने दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहेत.
मासुंदा तलावाकाठी गडकरी रंगायतन चौकात ठाकरे गटाकडून आनंद चॅरीटेबल ट्रस्टची दिवाळी पहाट होणार आहे. तेथून जवळच रंगो बापूजी चौकात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने, तर तलावपाळी राजवंत पेढीसमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून युवा जल्लोष साजरा होणार आहे. दिवाळी पहाटच्या जल्लोषासाठी ‘लाईव्ह डिजे शो’ची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
होतकरू गायिका पल्लवी दाभोळकर आपली अदाकारी पेश करणार आहे. यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली भागातून अनेक तरुण-तरुणी एकत्र जमणार असल्याने दिवाळी पहाट कार्यक्रमातून उमेदवार तरुणाईमध्ये आपल्या प्रचाराची संधी साधणार असल्याचे समजते.