घर घेताना महारेरा नोंदणी प्रमाणपत्र पाहूनच घ्या !

- महारेरा प्रमाणपत्र देणार प्रकल्पाची महत्त्वपूर्ण माहिती

    07-Jun-2025
Total Views | 5
 
MahaRERA registration certificate
 
मुंबई: आयुष्यभराची कमाई गृह प्रकल्पावर लावणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना महरेराने दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचे परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची प्राथमिक माहिती अत्यावश्यक आणि ग्राहककेंद्रीत माहितीची आवश्यकता लक्षात घेता अमुलाग्र बदल केले आहेत.
 
यापूर्वीच्या प्रमाणपत्रात फक्त प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते एका ओळीत दिले जायचे. आता ही माहिती वाचायला आणि समजायला सोपी जावी यासाठी बुलेट पॉईंट्स देण्यात येईल. शिवाय या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ, इमारतीचे व विंग्सचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले, प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या, इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे त्याचा तपशील दर्शवणारे अत्यंत महत्त्वाचे प्रारंभ प्रमाणपत्र ; चारचाकी , दुचाकी आणि अभ्यागतांसाठींच्या एकूण पार्किंगची संख्या हा समग्र तपशील या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात पहिल्यांदाच असणार आहे.
 
एवढेच नाही पुढे त्या प्रकल्पाच्या आयुष्यात प्रवर्तकाने प्रकल्पाच्या कुठल्याही बाबीत काही दुरुस्त्या केल्यास, प्रकल्पाला मुदतवाढ घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतरण केल्यास हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात राहणार आहे. सर्व प्रवर्तक हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करीत असतातच. प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असते.
 
नवीन महारेरा नोंदणी प्रमाणपत्रांची वैशिष्ट्ये
 
* गृहनिर्माण प्रकल्पाचे व प्रवर्तकाचे नाव, पत्ता , नोंदणीक्रमांक
* प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ
* इमारतीचे, विंगचे नाव/ क्रमांक
* प्रकल्पाचे निवासयोग्य मंजूर मजले
* निवासी / अनिवासी इमारती किती
* बांधकाम परवानगी किती मजल्यापर्यंत आहे हे दर्शवणारे प्रमाणपत्र
* चारचाकी, दुचाकी, अभ्यागतांसाठी अशी एकूण सर्व पार्किंग किती
* शिवाय संबंधित प्रकल्पात भविष्यात काही दुरूस्त्या, मुदतवाढ
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121