जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या वतीने ठाणे जिल्ह्यातील धारोळ गाव - वांगणी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

    23-Jun-2025
Total Views | 16

मुंबई : जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील धारोळ गाव - वांगणी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. नर म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या सोबत शिक्षण ही सुद्धा अत्यंत महत्वाची मूलभूत गरज बनली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात, अनेक वेळा विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडतात. गरिबीमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांना नैराश्य येऊ शकते. त्यामुळे धारोळ सारख्या आदिवासी व ग्रामीण भागात आम्ही गेली १५ वर्षे शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत व यापुढेही हा समाजसेवेचा वसा आणि वारसा निरंतर चालू ठेवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमित पवार, सेक्रेटरी हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर, संयोजक गणेश पार्टे, प्रशांत पवार, प्रसिद्धी प्रमुख रवि जाधव, ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद साळवी, अशोक भास्कर, प्रकाश सकपाळ, दिलीप पाटील, मेघनाथ शेट्टी, तसेच पदाधिकारी राजू राणे, गणेश काळे, संतोष सकपाळ, मंगेश पिंपरकर, संदीप सकपाळ, विकास थोरात, शंकर साळवी, नंदकुमार चिबडे, विजय चौरसिया, अविनाश पवार, सतिश कार्लेकर, नागेश तांदळेकर, प्रेम सरजिने, गिरीष मकवाना, बाळा खोचरे, बाजीराव तुपे, विजय शिर्के, प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121