मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने साकोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तर ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड विधानसभा मतदारसंघ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चिमूर विधानसभा मतदारसंघ आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस पक्षात जागा वाटपावरून जोरदार शाब्दिक चकमकी सुरू होत्या. यात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये तु तु मै मै सुरू होते. काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांच्यात काही जागांवर यांच्यात शाब्दिक कलगितुरा रंगला होता.
गेली अनेक दिवस शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी सुरू होती. विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र होतं. काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांच्यात तर काही जागांवरूनअंतर्गत वाद निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र या सुरू असलेल्या राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला असून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली यादी जाहीर झाली असून पुढील प्रमाणे :-
काँग्रेसची यादी जाहीर