बॉलिवूडमधील गणरायाच्या 'या' गाण्यांशिवाय गणेशोत्सव अपुर्णच

    18-Sep-2023
Total Views |
 
bollywood and ganpati
 
 
मुंबई : "गणपती बाप्पा मोरया..." म्हटल्यानंतर एक वेगळीच उर्जा अंगात संचारते. गणरायाच्या आगमनाने चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण सगळीकडेच अनुभवण्यास मिळते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही गणरायाच्या आगमनाची आणि गणेशोत्सवाची अनेक गाणी खरं तर सुपरहिट आहेत आणि जी मिरवणूकीत वाजवली नाही तर हा उत्सव खरंच अपुर्ण वाटेल. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील गणपती बाप्पाची काही खास गाणी जाणून घेऊयात...
 
१- अभिनेता ह्रतिक रोशनच्या अग्निपथ या चित्रपटातील 'देवा श्री गणेशा' या गाण्याचे बोल ऐकताच पाय थिरकण्यास सुरुवात होते. अजय-अतुल गोगावले या मराठमोळ्या गायक आणि संगीतकारांनी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केलेल्या या गाण्याची उर्जा काही औरच आहे.
 

hrithik roshan 
 
२- 'मोरया' या मराठी चित्रपटातील 'गणाधिशा भालचंद्रा' असे बोल अणाऱ्या गाण्याचे गायक आहेत ज्ञानेश्वर मेश्राम आणि स्वप्नील बांदोडकर. या गाण्याचे प्रत्येक शब्द ऐकल्यानंतर भाविक नक्कीच गणरायाच्या चरणी लीन होतात.
 
 
morya
 
३- 'तुझको फिरसे जलवा दिखाना ही होगा' हे अभिनेता शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या डॉन चित्रपटातील गाणे आणि बाप्पाची मिरवणूक हे समीकरण पक्के आहे.
 

shahrukh 
 
४- 'मोरया मोरया' हे 'उलाढाल' या मराठी चित्रपटातील गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. तर अजय गोगावले यांनी आपल्या आवाजात गाण्याला स्वरबद्ध केले होते.
 

uladhal 
 
५- नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा याच्या 'एबीसीडी' चित्रपटातील 'ग ग गणपती' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
 

ganpati 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.