"मराठीत नितीन देसाईंसोबत काम करणार होते पण", पल्लवी जोशी झाली भावूक

    14-Sep-2023
Total Views |
 

nitin and pallavi
रसिका शिंदे-पॉल 
 
मुंबई : बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिने कला क्षेत्रात फार मोठा पल्ला गाठला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यापासून मराठी मनोरंजसृष्टीत पुन्हा पल्लवी दिसलीच नाही. पुन्हा मराठी मनोरंजनसृष्टीत येणार का? असा प्रश्न विचारला असता कला दिग्दर्शक नितीन देसाईंसोबत मराठीत काम करणार होते, परंतु आता ते शक्य नाही असे म्हणत नितीन यांच्या आठवणीत पल्लवी जोशी भावूक झाली. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट लवकरच देशभरात प्रदर्शित होणार असून चित्रपटाशी निगडीत संवाद साधताना पल्लवीने अनेक खुलासे केले.
 
नितीन देसाईसोबत काम करणार होते पण....
 
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राची सुरुवात करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी पुन्हा मराठी मनोरंजनसृष्टीकडे वळणार का? असा प्रश्न गेली अनेक वर्ष पडला असून त्याबद्दल पल्लवीनेच उत्तर दिले आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत एक मोठा प्रकल्प करण्याचा विचार होता. त्यासाठी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याशी बोलणे झाले होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर तो प्रकल्प शक्य होईल की नाही या संभ्रमात मी आहे”, अशी कबूली पल्लवीने दिली.
 
 
‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारताची पहिली स्वतःची लस बनवणाऱ्या असामान्य शास्त्रज्ञांची ही कथा २८ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.