हिंदू धर्म हा ऑस्ट्रेलियातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म!

ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री टिम वॉट्स यांचे विधान

    24-May-2023
Total Views |
Tim Watts on Hindu religion

नवी दिल्ली
: नेपाळ दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री टिम वॉट्स यांनी पशुपती मंदिर परिसराला भेट दिली. पशुपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "हिंदू धर्म हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे.त्यामुळे आधुनिक ऑस्ट्रेलियाची विविधता आपल्याला दक्षिण आशियासह जगाच्या प्रत्येक भागाशी जोडते."

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग म्हणाले की, जेव्हा ऑस्ट्रेलियन लोक जगाकडे पाहतात, तेव्हा आपण त्यात स्वतःला प्रतिबिंबित करतो.फक्त नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराला भेट दिल्याने जग आपल्यामध्ये प्रतिबिंबित झालेले पाहू शकते,आणि दक्षिण आशियातील हिंदू आणि इतरांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून त्याचे महत्त्व आणि त्यापलीकडे महत्त्वाची भावना या संबंधावर प्रकाश टाकते आणि ते आश्चर्यकारकपणे फायद्याचे होते."

हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगाच्या काही भागात अंदाजे १.२ अब्ज हिंदू आहेत. त्याचबरोबर भारत ,नेपाळ आणि मॉरिशस या तीन देशांमध्ये प्रबळ धर्म म्हणून हिंदू धर्माचे पालन केले जाते. ओशिआनिया खंडासह जगाच्या विविध भागांमध्ये हिंदू धर्म आपला ठसा विस्तारत आहे.अलीकडेच टिम वॉट्स यांनी नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली. त्यामुळे दक्षिण आशियातील हिंदू आणि इतरांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून पशुपतीनाथ मंदिराचे महत्त्व काय आहे.त्यावर त्यांनी भाष्य केले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.