जागावाटपावर आता काँग्रेसनंही राऊतांना फटकारलं! म्हणाले...
मेरीटवरच जागा वाटप होणार असल्याचं केलं वक्तव्य
23-May-2023
Total Views | 172
मुंबई : आमचे महाराष्ट्रातून १८ तर दादरा नगर हवेलीमधून एक असे एकूण १९ खासदार लोकसभेत जातील असं वक्तव्य वारंवार संजय राऊतांकडून करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे. जागा वाटपावर बोलताना जागा या मेरिटच्या आधारावरच वाटप होणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. कोणाला जागा वाटपात कमी- जास्त जागा मिळतात हे महत्तवाचं नसून कोण जास्त जागा जिंकू शकत हे लक्षात घेऊन जागा वाटप केले जाणार असल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळे जिंकून येईल त्यांलाच जागा दिल्या जातील. आणि भाजपचा पराभव हेच आमचे उद्देश आहे, असे ही पटोले म्हणाले.