'मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे' ; मुंबई पोलिसांना थेट ट्विटरवरून धमकी

    23-May-2023
Total Views |
Mumbai Police Threats from Twitter

मुंबई
: मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे, अशी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना निनावी धमकी मिळाली असून यंदा ही धमकी फोन किंवा ईमेलवरुन नाही तर ट्विटरवरुन देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांकडून तत्काळ याप्रकरणी तपासास सुरवात करण्यात आली असून यासंबंधी अधिक चौकशी देखील करण्यात येत आहे. सोमवार दिनांक २२ मे रोजी मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर "मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे" असा मेसेज पाठवण्यात आला. दरम्यान हा मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला असून "I M Gonna Blast The Mumbai Very Soon", असे यात लिहिण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.