"आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली! तुमच्या सारखी तोंडाला पानं पुसली नाही!"

अजित पवार, भुजबळांना एकनाथ शिंदेंचं रोखठोक उत्तर

    09-Mar-2023
Total Views |
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक झाले आहेत. कांदा प्रश्नावरून विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. अवकाळी पावसामुळे शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर बाब असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या करत असल्याचं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर शेतकरी संकटात असताना सरकार त्यांना मदत करण्याचं आश्वासनही देत नसल्याचं पवार म्हणाले.
 
अजित पवार, भुजबळांनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलचं प्रत्त्युत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले, "शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारचीही भूमिका आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यानंतर तत्काळ मदत करण्यात येईल. कांदा उत्पादकांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे. काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू आहे. आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली. तुमच्या सारखी तोंडाला पानं पुसली नाही." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत नक्की पोहोचेल असा विश्वासाचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहाला दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण नको असं आवाहन त्यांनी विरोधकांना दिलं. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, असं म्हणत त्यांनी याच वक्तव्यावर जोर दिला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.