‘भारत मॅट्रिमोनी’चा जाहिरातीतून हिंदूद्वेष...

हिंदूंच्या सणांचीच बदनामी का?, नेटकर्‍यांचा सवाल

    11-Mar-2023
Total Views |
Hindu hatred through advertisement of 'Bharat Matrimony'...


मुंबई: शेफाली ढवण : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ञ्च्कळपर्वीझहेलळलडुळससू आणि ञ्च्इेूलेीींंइहरीरींचरीींळोपू हे ‘ट्रेंडिंग’वर असल्याचे पाहण्यास मिळत आहे. पण नेमके कारण काय की नेटकर्‍यांनी हे दोन ‘हॅशटॅग’ इतक्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. ‘भारत मॅट्रिमोनी’ या विवाहविषयक संकेतस्थळावर होळीच्या निमित्ताने महिला दिनाचा विशेष व्हिडिओ शेअर करण्यात आला. पण या व्हिडिओमध्ये महिलांना होणार्‍या अत्याचारांचे अनुभव त्यांना होळीच्या उत्सवात सहभागी होण्यापासून रोखतात, असे दाखवण्यात आले. मात्र ट्विटरवर ‘भारत मॅट्रिमोनी’ने पोस्ट केलेल्या व्हिडिओने हिंदूंचा रोष ओढवून घेतला आहे. काही वापरकर्त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल व्हिडिओचे कौतुक केले असले तरीही, समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड वादविवाद सुरू झाल्यामुळे #BoycottBharatMatrimony ट्विटरवर ट्रेंड झाला आहे.


Hindu hatred through advertisement of 'Bharat Matrimony'...



काय आहे ‘भारत मॅट्रिमोनी’ची व्हायरल जाहिरात?


‘भारत मॅट्रिमोनी’ने शेअर केलेल्या ’व्हायरल’ व्हिडिओमध्ये एक महिला होळीच्या रंगांनी रंगलेला चेहरा धुताना दिसत आहे. जसजसे रंग फिके पडू लागले, तसतसे दुसरा चेहरा उदयास आला, जो उत्सवाच्या वेषात झालेल्या गैरवर्तन आणि छळाचे रूप होते. या ‘व्हायरल’ व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, हा महिला दिन आणि होळी, महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक समावेशक जागा तयार करून साजरी करूया. सार्वजनिक ठिकाणी महिलांना ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते ते मान्य करणे आणि त्यांच्या कल्याणाचा आज आणि कायमचा आदर करणारा समाज निर्माण करणे महत्त्वाचे आहे. #BharatMatrimony #BeChoosy.

काय होते ‘स्विगी’च्या ‘व्हायरल’ जाहिरातीमध्ये?

’स्विगी’ने होळीच्या निमित्ताने ही जाहिरात दिली असून ‘अंडे ऑमलेट बनवण्यासाठी, अंडे हाल्फ बॉईल ऑमलेट बनवण्यासाठी, अंडे कुणाच्या डोक्यात फोडण्यासाठी नाही’ अशा आशयाचा मजकूर या जाहिरातीमधून प्रसिद्ध केला होता.दरम्यान, ‘स्विगी’ची सर्व ‘होर्डिंग्ज’ काढण्यात आली आहेत. या प्रकरणावर कंपनीने अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही ‘स्विगी’ कंपनी त्यांच्या जाहिरातींमुळे अडचणी सापडली होती. गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरातींमधील हिंदूंविरोधी आक्षेपार्ह मजकुरामुळे अनेक कंपन्यांना ग्राहकांचा रोष पत्करावा लागला आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया


  1. मी वचन देतो की, मी कधीही तुमच्या पोर्टलची शिफारस कोणालाही करणार नाही! मी ही पोस्ट त्यांना दाखवीन आणि मला खात्री आहे की, ही वेबसाईट का वापरू नये, हे त्यांना पटले असेल!


  2. तुम्ही लोक निर्लज्ज आहात की काय? तुम्हाला हिंदू ग्राहक नकोत की, तुम्हाला हिंदू ग्राहकांची पर्वा नाही? तुमची जाहिरात तुमच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाका आणि बिनशर्त माफी मागा, अन्यथा तुमच्या कंपनीविरुद्ध चॅम्पियन हिंदूंकडून सुरू होईल.


  3. तुम्ही अगदी घृणास्पद आहात. होळी या हिंदू सणाशी सामाजिक संदेश जोडण्याची तुमची हिंमत कशी झाली? कौटुंबिक अत्याचाराचा होळीशी काय संबंध आहे? तुमचे मन हरवले आहे का? तुम्हाला नक्कीच हिंदू ग्राहक नको आहेत. तुमच्या भयानक संकेतस्थळावर काय होते, यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे.


#BoycottBharatMatrimony, #HinduPhobicSwiggy ट्विटरवर ’ट्रेंडिंग’ची कारणे


समाजमाध्यम वापरकर्त्यांनी #BoycottBharatMatrimony आणि #HinduPhobicSwiggy ट्रेंड केला आहे. अनेक नेटकर्त्यांनी ‘भारत मॅट्रिमोनी’ आणि ’स्विगी’ला खडे बोल सुनावले आहे. इतर धर्मीयांच्या सणांना ‘स्विगी’ आणि ‘भारत मॅट्रिमोनी’ने कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या होत्या, याची ही आठवण नेटकर्‍यांनी करून दिली आहे. नाताळला ‘हॅप्पी ख्रिस्मस’ म्हटले, ईदला ‘ईद मुबारक’ म्हटले, मग हिंदूंच्या सणाची बदनामी का करत आहे, असा सवालही अनेक नेटकरांनी उपस्थित केला आहे.

'झोमॅटो’कडूनही हिंदूंच्या भावनांशी खेळ?


‘झोमॅटो’ या फूड डिलिव्हरी कंपनीच्या एका जाहिरातीत बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्याला पाहण्यास मिळतो. पण या जाहिरातीवर पुजार्‍यांकडून आक्षेप घेण्यात आला. कारण, हृतिक रोशनच्या या ‘झोमॅटो’ जाहिरातीमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावरून संपूर्ण वादाला तोंड फुटले. ‘थाली का मन किया, उज्जैन में, फिर महाकाल से मंगवा लिया’ हे वाक्य हृतिक रोशन बोलताना या जाहिरातीत दिसतो. मात्र, या जाहिरातीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप महाकाल मंदिराच्या पुजार्‍यांकडून करण्यात आला. दरम्यान, ‘झोमॅटो’कडून यासंदर्भात त्वरित माफी मागण्यात आली.

...म्हणून कर्मचार्‍याला ‘स्विगी’ने दिला होता नारळ!


मांसाहारी जेवणाची ऑर्डर मंदिर परिसरात देण्यास नकार दिल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ‘स्विगी’तून एका ‘डिलिव्हरी बॉय’ला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. हे प्रकरण दिल्लीतील असून ‘काश्मीर गेट’ येथे असलेल्या प्रसिद्ध मार्गात बाबा हनुमान मंदिर परिसराजवळ मांसाहारी जेवणाची ऑर्डर देण्यास नकार दिल्याप्रकरणी त्याला नोकरीवरुन काढले होते.

आता या गोष्टी हिंदू खपवून घेत नाही


प्रत्येकाला असे वाटते की, हिंदूंना ज्ञान देणे गरजेचे आहे. हिंदूंना होळीला पाणी वापरू नका, असे अनेक सल्ले देण्यात येतात. ‘स्विगी’ने त्यांची जाहिरात मागे घेतली असून ‘भारत मॅट्रिमोनी’सुद्धा पावले उचलेल. हिंदू आता जागृत झाले आहेत. ते आता या गोष्टी खपवून घेत नाही.
- शेफाली वैद्य, ज्येष्ठ लेखिका




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.