सफाई कर्मचाऱ्याला कट्टरपंथींकडून मारहाण; आचार्य बालमुकुंद म्हणाले - गेहलोतचा 'मुघल काळ'

    21-Nov-2023
Total Views |
rajasthan-fir-against-muslims-for-beating-sanitation-worker-protest-against-the-assault-in-jaipur

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये वंचित समाजातील एका सफाई कामगाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कट्टरपंथींवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे उमेदवार आचार्य बालमुकुंद यांनी वाल्मिकी समाजाच्या लोकांसह हातात झाडू घेऊन निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ही घटना दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी घडली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या शास्त्री नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. येथील किशनपोळ भागातील वॉर्ड क्रमांक ५५ मध्ये वाल्मिकी समाजातील सफाई कामगाराला कट्टरपंथी तरुणाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पीडित सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, जेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचले पण पोलिसांनी त्यांच्या एफआयआरची नोंद केली नाही. या घटनेमुळे इतर सफाई कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला.

भारतीय जनता पक्षाचे हवामहल येथील विधानसभा उमेदवार आचार्य बालमुकुंद यांना ही बाब कळताच त्यांनीही सहकार्‍यांसह पोलीस ठाणे गाठले. पोलिस आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप करत त्यांनी समर्थकांसह आंदोलन केले. यावेळी जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दबावाखाली अखेर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवला.

काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलकांना कडक कारवाईचे आश्वासन देऊन शांत केले.निषेधादरम्यान, इतर स्वच्छता कर्मचार्‍यांनी आरोप केला की, कट्टरपंथी लोक त्यांना दररोज मारहाण करतात. आपल्या तक्रारींकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, आचार्य बालमुकुंद यांनी आरोप केला की एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी केवळ एका भागात नाही तर अनेक भागात दहशत निर्माण केली आहे. त्यांनी गेहलोत सरकारच्या राजवटीला ‘मुघल काळ’ असे नाव दिले. काँग्रेस सरकारच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणामुळे त्यांचे हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सामील होत असल्याचा दावाही आचार्य बालमुकुंद यांनी केला आहे.
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.