मुलुंड प्रकल्पग्रस्त पुनर्वसन घोटाळाप्रकरणी सोमय्यांनी दाखल केली तक्रार!
20-Nov-2023
Total Views |
मुंबई : मुलुंड प्रकल्पग्रस्त पुनर्वसन घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे. मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, देवनार येथील ५०,००० लोकांचे स्थलांतर मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ करण्याच्या ठाकरे सरकार घोटाळ्याच्या विरोधात नवघर पूर्व पोलिस स्टेशन येथे सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे.
२२ मार्च २०२२ रोजी ठाकरे सरकार व मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल चहल यांनी भ्रष्ट पद्धतीने हा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला दिला. मुलुंड पूर्वची सद्याची लोकसंख्या १ लाख यात ५०,००० लोकांची भर होणार. यात २५,००० बांग्लादेशी असणार. महापालिकेच्या या घोटाळ्याविरूद्ध महापलिका अधिकारी, ठाकरे सरकारचे अधिकारी व ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी या कंपनीचे चोरडिया यांच्या विरोधात आयपीसी कलम ४०६, ४०८, ४०९, १२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.