विलेपार्ले येथे इमारतीला आग; एका वृद्ध महिलेचा मृत्यू

    11-Nov-2023
Total Views | 23
Building fire at Vileparle

मुंबई :
विलेपार्ले पूर्व येथील पुनम बाग, नरिमन रोड स्थित विले ग्रँड या रहिवासी इमारतीला सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत ९५ वर्षीय हर्षदा जनार्दन फाटक या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

तळ अधिक १२ मजल्यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०१ मधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लाकडी फर्निचर, लाकडी दारे, फॉल्स सिलिंग, घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ आदीना आग लागली.
 
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत रात्री ८.०५ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदरणाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे व संपूर्ण डिजिटल मीडिया परिषद सातत्याने पाठपुरावा करत होती आज अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने 3 जून 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121