पेंग्विनची शुभवार्ता

    24-Jan-2023   
Total Views | 144
 
Emperor Penguin
 
 
गात केवळ अंटार्क्टिका खंडावरच ’एम्परर पेंग्विन’ ही पक्ष्याची प्रजात आढळते. संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत असणारी ही प्रजात अंटार्क्टिका खंडाला प्रदेशनिष्ठ आहे. गेल्या काही वर्षांपासून बर्फातच अधिवास करणार्‍या या प्रजातीच्या वसाहतींना हवामान बदलाचा फटका बसतो आहे. जगात पेंग्विन या पक्ष्याच्या 18 प्रजाती सापडतात. त्यामधील ’एम्परर पेंग्विन’ ही आकाराने सगळ्यात मोठी प्रजात. जवळपास चार फुटांपर्यंत वाढणारे हे पेंग्विन मोठ्या संख्येने वसाहती करून राहतात. मात्र, वातावरणीय बदलांमुळे अंटार्क्टिका खंडावरील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. परिणामी, अधिवास नष्टतेमुळे ’एम्परर पेंग्विन’च्या वसाहतीची संख्या कमी झाली. अमेरिकी सरकारच्या म्हणण्यानुसार, वातावरणातील बदलांमुळे या पक्ष्यांच्या प्रजननाचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत.
 
अंटार्क्टिकाच्या पश्चिमेला असणार्‍या वेडेल समुद्रामध्ये ’एम्परर पेंग्विन’ची हैली बे ही दुसरी मोठी वसाहत आहे. मात्र, 2016 साली येथील बर्फ वितळल्यामुळे त्यावर्षी जन्मलेली ’एम्परर पेंग्विन’ची सर्व पिल्ले पाण्यात बुडाली. त्यापुढील वर्षांमध्ये हे चित्र काही फार संख्येने कायम राहिले. 2019 साली अंटार्क्टिका खंडातील तापमानात झालेली वाढ आणि वादळी वार्‍यामुळे तेथील मोठा हिमनग खंड पावला. परिणामी, 2017 ते 2019 दरम्यान जन्मलेली जवळपास सर्वच पिल्लांना जलसमाधी मिळाली. परिणामी,गेल्यावर्षी अमेरिका सरकारने ’एम्परर पेंग्विन’ पक्ष्यांना ’अमेरिका लुप्तप्राय प्रजाती अधिनियमा’अंतर्गत संरक्षण दिले.
 
अशा संकटग्रस्त पक्ष्यांबाबत आता एक आनंदवार्ता समोर आली आहे. अधिवास नष्टतेचा सामना करणार्‍या या प्रजातीच्या संवर्धनासंदर्भात ही बाब आनंदाची आहे. ‘सॅटेलाईट मॅपिंग’ तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधकांनी अंटार्क्टिका खंडावर ’एम्परर पेंग्विन’ची एक नवीन वसाहत शोधून काढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘पेंग्विन जनजागृती दिना’च्या दिवशी ’एम्परर पेंग्विन’संदर्भातील ही माहिती उघड झाली. ’ब्रिटिश अंटार्क्टिका सर्वेक्षण’मधील (बीएएस) संशोधकांनी ’एम्परर पेंग्विन’ची ही नवीन वसाहत शोधून काढली आहे. ‘सॅटलाईट मॅपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून शोधलेल्या ’एम्परर पेंग्विन’च्या प्रजनन स्थळांमधील ही अलीकडची सर्वात मोठी वसाहत आहे. ’युरोपियन युनियन’च्या ’कोपरनिकस सेन्टिनल-2’ या उपग्रह मोहिमांनी अंटार्क्टिका खंडावर टिपलेल्या छायाचित्रांचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यावरून या वसाहतीमध्ये 500 पक्षी वास्तव्यास असल्याचा अंदाज लावून ही नवीन वसाहत शोधून काढली.
 
’एम्परर पेंग्विन’च्या वसाहती या अंटार्क्टिका खंडावर फार दुर्गम आणि अत्यंत थंड भागात आढळतात. ’बीएएस’च्या नोंदीनुसार या ठिकाणचे तापमान साधारण उणे 60 अंश सेल्सिअसपर्यंत असते. अशा परिस्थितीत त्याठिकाणी अभ्यास करणे खूप कठीण काम होऊन बसते. त्यामुळेच संशोधक ‘सॅटलाईट मॅपिंग’च्या आधारे सर्वप्रथम पेंग्विनच्या संभाव्य वसाहतींचा अंदाज घेतात. ’बीएएस’च्या संशोधकांचे अलीकडचे अंदाज सूचित करतात की, सध्याच्या तापमानवाढीच्या कलानुसार या शतकाच्या अखेरीस ’एम्परर पेंग्विन’च्या 80 टक्के वसाहती या अर्ध नामशेष होऊ शकतात.
 
’पीएलओएस बायोलॉजी’ या संशोधन पत्रिकेतील शोधनिबंधानुसार, 21व्या शतकापर्यंत अंटार्क्टिका खंडावर अधिवास करणार्‍या 97 टक्के प्रजातींना नामशेष होण्याचा धोका आहे. या संशोधनात असेही आढळून आले आहे की, अंटार्क्टिका खंडावर जैवविविधता संवर्धनासाठी दहा प्रमुख धोरणे अंमलात आणावी लागतील. त्यासाठी दरवर्षी 23 दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च करावा लागेल. अंटार्क्टिका खंडावर राहणार्‍या प्रजाती तेथील थंड वातावरणाला अनुकूलित झाल्या आहेत, अशा परिस्थितीत तापमानात होणारी वाढ आणि त्यामुळे अधिवास होणारे बदल प्रजातींच्या अनुकूलतेच्या आड येत आहेत. अंटार्क्टिका खंड हा केवळ त्यावरील प्रजातींसाठी आवश्यक आहे असे नाही. मानवालादेखील या खंडामुळे अनेक फायदे आहेत. वातावरणातील अभिसरण आणि कार्बनडाय ऑक्साईड शोषून जागतिक हवामानाचे नियमन करण्यास हा खंड महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच, महासागरातील अंतर्गत प्रवाहांना कार्यान्वित ठेवण्यात या खंडावरील हवामान कारणीभूत असते. त्यामुळे या खंडावर अधिवास करणार्‍या प्रजातींचे संवर्धन झाल्यास अप्रत्यक्षरित्या या खंडाचे संरक्षणाचे कवच प्राप्त होईल.
 
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121