हवाई टॅक्सीची नांदी...

    05-Jul-2025
Total Views |

air taxi
 
 
कल्पना करा की, तुम्ही एका वर्दळीच्या शहरातील मध्यभागातून विमान टॅक्सीने झेप घेऊन आणि गर्दीच्या रस्त्यावरून उपनगरातील तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत अगदी काही मिनिटांत पोहोचत आहात. हे असंभव वाटतंय का? मात्र, तुम्हाला वाटेल त्यापेक्षाही अत्यंत वेगाने ही प्रगत वाहतूक व्यवस्था प्रत्यक्षात साकारत आहे. हवाई टॅक्सी सेवा सुरू करून शहरातील रस्ते आणि महामार्गांवरील वाहतुककोंडी कमी करण्याची क्षमता आहे. ही सुविधा एक कार्यक्षम विमानतळ हस्तांतरण करत प्रवासाचा वेळ कमी करू शकते आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढवू शकते. शिवाय, ‘अ‍ॅडव्हान्स्ड एअर मोबिलिटी’ शहर केंद्रे आणि उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारू शकते, ज्यामुळे प्रवाशांना पारंपरिक जमिनीवर आधारित वाहतुकीसाठी जलद आणि संभाव्यतः अधिक पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
 
जगातील मोठ्या महानगरांमध्ये वाहतुकीची समस्या जटिल होते आहे. हेच पाहता, आता भारत, दुबई आणि न्यूयॉर्कसारख्या प्रमुख शहरांमध्ये भविष्यकालीन अद्ययावत वाहतूक व्यवस्था उभारण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे. वर्षभरापूर्वीच युकेच्या वाहतूक विभागाने आपला ‘फ्युचर ऑफ फ्लाईट अ‍ॅक्शन प्लॅन’ जारी केला आहे, ज्यामध्ये दोन वर्षांच्या आत लंडनमध्ये पहिल्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लॅण्डिंग टॅक्सी चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, तर जनरल सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीने युएईमध्ये फ्लायिंग टॅक्सींना विद्यमान हेलिपॅडवर उड्डाण आणि उतरण्याची परवानगी दिली आहे. दुबई पुढील वर्षी हवाई टॅक्सी सुरू करण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या योजनांमध्ये अमिरातीच्या चार ठिकाणी टेक-ऑफ आणि लॅण्डिंगची परवानगी देण्यात आली आहे.
 
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पाम जुमेराह, डाऊनटाऊन दुबई आणि दुबई मरीना येथे हवाई टॅक्सीना टेक-ऑफ आणि लॅण्डिंगची परवानगी देणारे व्हर्टीपोर्ट बांधले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी किफायतशीर मॉडेलला परवानगी देण्यात आली आहे. युएईमध्ये फ्लाईंग कॅबच्या ऑपरेशनल तयारीला गती देण्यासाठी नियामक चौकट तयार करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पारंपरिक हेलिकॉप्टर पॅड आणि इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लॅण्डिंग पॅड दोन्हीच्या वापरास परवानगी मिळेल. दुबईने अलीकडेच 2025 मध्ये व्यावसायिकरित्या लॉन्च होण्यापूर्वी पहिले हवाई टॅक्सी चाचणी उड्डाण पूर्ण केले.
 
दीडशेहून अधिक तंत्रज्ञान कंपन्या या हवाई वाहनांच्या विकासासाठी कार्यरत आहेत आणि भविष्यातील उडणारी टॅक्सी ड्रोनसारखी दिसेल, यावर मोठ्या प्रमाणात एकमत झाले आहे. गेल्या 15 वर्षांत ड्रोन हे खेळणे, फिल्मिंग, दूरच्या ठिकाणी पार्सल पोहोचवण्यास आणि हलके डिस्प्ले लावण्यास सक्षम उपकरणांमध्ये विकसित झाले आहेत. लिथियम-आयर्न बॅटरी, इलेक्ट्रिक मोटर्स आणि उड्डाण मार्गदर्शन करण्यास मदत करणार्‍या सॉफ्टवेअरमधील प्रगतीमुळे हा बदल घडून आला आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, कॅलिफोर्निया-आधारित जॉबी एव्हिएशन ही ’शतढजङ’ विमान विकसित करणार्‍या कंपन्यांपैकी एक आहे. युकेमध्ये, ब्रिस्टल-आधारित व्हर्टिकल एरोस्पेस ही अग्रणी कंपनी आहे आणि तिच्या पाच-सीटर शतढजङ फ्लाईंग टॅक्सीच्या विकासासाठी तिला 37 दशलक्ष पाऊंड इतके सरकारी अनुदान मिळाले आहे. यामुळे युकेच्या ‘नागरी उड्डयन प्राधिकरणा’सोबत डिझाईन मंजुरीचा टप्पा पार पडला आहे आणि 2026 पर्यंत लंडनमध्ये चाचणी सुरू करण्याचा अंदाज आहे. याठिकाणीदेखील व्हर्टीपोर्ट्ससाठी ठिकाणे शोधली जात आहेत, जिथे फ्लाईंग टॅक्सी उड्डाण करू शकतील आणि उतरू शकतील.
 
हवाई सुरक्षा तज्ज्ञ एबेनी यांनी मार्च 2024 मध्ये दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, ’ली-आयन बॅटरीज जास्त चार्ज केल्यानंतर पेट घेऊ शकतात. कमी उंचीवर आणि शहरी भागात काम केल्याने पक्ष्यांना धडकण्याची शक्यतादेखील वाढते. म्हणून उत्पादकांनी नुकसानाचा परिणाम विचारात घेतला पाहिजे (विशेषतः बॅटरी आणि लिफ्ट थ्रस्ट युनिट्सभोवती). या सर्व आव्हानांवर जागतिक पातळीवर अभ्यास आणि संशोधन सुरू आहे, जे सुरक्षित, शाश्वत आणि संपूर्ण समाजासाठी फायदेशीर ठरेल, यात शंका नाही.