आणखी एक शिवसेना नेता कारवाईच्या फेऱ्यात ?

यशवंत जाधवांनंतर कुणाचा नंबर लागणार ?

    29-Mar-2022   
Total Views | 189
 
another shivsena leader
 
 
 
मुंबई : विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांच्यानंतर आता मुंबईतील आणखी एका शिवसेना खासदाराच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारवाईचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता असलेला तो खासदार ’मातोश्री’ आणि ठाकरे कुटुंबाच्या जवळचा समजला जात असून, त्याचे महापालिकेशीदेखील संबंध जुडले गेलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ’त्या’ खासदारावर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजर खिळल्या आहेत.
 
 
 
 
‘हद्द कर दी...‘
भाजपचे नेते आणि माजी खसदार किरीट सोमय्या यांनी सोमवार, दि. 28 मार्च रोजी, ‘’हद्द कर दी यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रे ‘मातोश्री’ला वाचविण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव द्यावे. वाईट वाटते. 50 लाखांचे घड्याळ, दोन कोटी रोख जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल,” असे ट्विट केले आहे.
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121