दरड कोसळल्याने वाहतूक विसकळीत – दोन दिवस या शहरात अर्ल्ट जारी केला
23-May-2025
Total Views | 24
पुणे : महाराष्ट्रात पाऊसाचा जोर वेगाने वाढतोय, पुणे शहर आणि परिसरात काल रात्री पासूनंच पाऊसाने अधिकच जोर धरला असून, न्यू कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली व पुणे-खेड शिवापुर महामार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटणेमुळे प्रवाश्यांचे हाल झाले असून प्रशासनाने देखिल तातडिने मोहिम हाती घेतली आहे असे दिसते.
गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय. बुधवारी २१ मे रोजी रात्री न्यू कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली, पाण्यामुळे डोंगरावरील माती खचली व दगड रस्त्यावर आले. पुणे-खेड शिवापुर महामार्गावरील वाहतूकीचा मार्ग बंद झाला असून (NHAI) चे कर्मचारी पहाटे पासून दरड हटवण्याच्या मागे आहेत. प्रशासनाने देखिल तातडिने मोहिम हाती घेतली व लवकरात-लवकर या घटने बाबत आसपासच्या लोकांना सावध केले.
अवकाळी पाऊसाची शक्यता अजून वाढेल व आणखी दरड कोसळन्याची शक्यता आहे या कारणाने हवामान खात्याने पुणे शहराला रेड अर्ल्ट जारी केला आहे. पुणे-खेड शिवापुर महामार्ग हा सातारा, कोल्हापूर सारख्या जागी जाण्यासाठी महत्वाचा मार्ग आहे. अश्या घटणांमुळे हजारो प्रवाश्यांचे हाल होतात. हवामानाचा अंदाज घेऊण आपला प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहान प्रशासनाने केले.