समिता कांबळे यांच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मान

ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ईशान्य मुंबई जिल्हा भाजपतर्फे "सेवा सप्ताह"चे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून वॉर्ड क्रमांक १०७ च्या स्थानिक भाजप नगरसेविका समिती विनोद कांबळे यांच्यावतीने वॉर्डातील सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.

    29-Dec-2021   
Total Views | 95
 
samita kamble_1
 
 
 
मुंबई : ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ईशान्य मुंबई जिल्हा भाजपतर्फे 'सेवा सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून वॉर्ड क्रमांक १०७ च्या स्थानिक भाजप नगरसेविका समिती विनोद कांबळे यांच्यावतीने वॉर्डातील सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. सफाई कामगारांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी मुलुंड येथे करण्यात आले होते.
 
 
 
भाजपच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून स्वच्छता, शौचालय या नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर पंतप्रधान यांनी भर दिला आहे. त्या मुळे आज लोकांना स्वच्छतेचे महत्व कळू लागले आहे. याची प्रेरणा घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निम्मित व खासदार मनोज कोटक यांच्या वाढदिवसाच्या निम्मित वॉर्ड क्रमांक १०७ मधील उपस्थित सर्व पुरुष आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि तुळसीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सुनील टोपले हसमूख भोजने,मनोज शहा,सविता राजपूत यांच्यासह ईशान्य मुंबई जिल्हा भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121