गंभीरला मिळालेल्या धमकीचे पाकिस्तानी कनेक्शन

दिल्ली खासदार गौतम गंभीरला मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

    दिनांक  25-Nov-2021 13:24:07
|

Gambhir_1  H x
 
 
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी आयसीस काश्मीरने दिली असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. या तपासादरम्यान हा धमकीचा मेल पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
मेलद्वारे गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा मेल पाकिस्तानातून आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या समोर आली. दिल्ली पोलिसांनी 'गूगल'कडे या मेलसंबंधी माहिती मागितली होती. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई मेल पाकिस्तानातून करण्यात आला आहे. हा मेल ज्या सिस्टममधून पाठवण्यात आला त्याचा आयपी अॅड्रेस (IP Address) पाकिस्तानात आढळला आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.