बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान ; मोठा शस्त्रसाठा जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |

bihar_1  H x W:



बिहार :
भारत-नेपाळ सीमेजवळ बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी शुक्रवारी सकाळी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) जवान आणि स्पेशल टास्क फोर्सचे जवान यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम राबवली. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले. या कारवाईत नक्षलवाद्यांकडून अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
 
एसएसबीचे आयजी संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांशी चकमक पहाटे ४.४५ वाजता झाली. यात एक सुरक्षा कर्मचारीही जखमी झाला आहे.वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांच्या एका गटाविषयी आम्हाला माहिती मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु होती.नक्षलवाद्यांच्या गटाचे नेतृत्व राम बाबू साहनी उर्फ ​​राजन करीत होता. त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, या चकमकीत त्याचा सहायक बिपुलसह इतर तीन जण ठार झाले. तर राम बाबू साहनीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे, असे संजय कुमार यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@