
नुकतीच इंग्लंडमध्ये ‘विम्बल्डन’ स्पर्धा पार पडल्या. टेनिस खेळातील सर्वाधिक चर्चेत असणारी ही स्पर्धा. भारतीय खेळाडू जरी या स्पर्धेत चमकले नसले, तरीही अन्य खेळातील अनेक भारतीय खेळाडू, सिनेतारका यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.२०२५ सालच्या ‘विम्बल्डन’ स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
जगातील सर्वांत जुनी लोकप्रिय आणि प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा ‘विम्बल्डन’ दि. २३ जून ते दि. १३ जुलै रोजी दरम्यान लंडनमध्ये संपन्न झाली. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी अशां सामन्यांमध्ये पुरुष किंवा महिला एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये भारताचे प्रतिनिधित्व नसले, तरी भारतीय अव्वल दुहेरी खेळाडू बुधवारी प्रारंभिक काही फेर्यांपासूनच भारतीय चाहत्यांना नाखूष करताना, तर भारतातून खास आलेले तारे-तारका चमकताना दिसले.
भारतीय झाले निराशच
माजी जागतिक क्रमांक एक आणि २०२४ ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी विजेता रोहन बोपण्णा हा मुख्य ड्रॉ कट-ऑफमध्ये स्थान मिळवणार्या चार भारतीयांपैकी सर्वांत अनुभवी होता. तथापि, अनुभवी रोहन बोपण्णा त्या आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्या फेरीतच बाहेर पडला. या पराभवामुळे त्याच्या ‘विम्बल्डन’ मोहिमेचाही निराशाजनक शेवट झाला. ४५ वर्षीय रोहन बोपण्णा सध्या देशाचा अव्वल खेळाडू राहिलेला नाही. या ‘विम्बल्डन’च्या प्रारंभी हा सन्मान ३२ वर्षीय युकी भांब्रीकडे होता. युकी जागतिक क्रमवारीत ३५व्या क्रमांकावर असल्याने, त्याला अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवे (३७वा जागतिक क्रमावारीत)सह १६वे मानांकन प्राप्त झाले. रविवारी २०२५च्या ‘विम्बल्डन’ मिश्र दुहेरी स्पर्धेत, भारताच्या युकी भांब्री आणि त्याच्या जोडीदार जियांग शिन्यू यांना उपउपांत्य सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला. युकी भांब्री आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवे यांचा रविवारी २०२५ ‘विम्बल्डन’मध्ये, पुरुष दुहेरीच्या उपउपांत्य सामन्यामध्ये पराभव झाला. जागतिक क्रमवारीत ७४व्या स्थानावर असलेल्या भारताच्या एन श्रीराम बालाजीने, पुरुष दुहेरीत प्रवेश केला होता. ३५ वर्षीय बालाजी पुरुष दुहेरीत युकी भांब्री आणि ऋत्विक बोलिपल्ली यांच्यासोबत सामील झाला. बालाजीच्या प्रगतीमुळे पुरुष दुहेरीच्या दुसर्या फेरीत प्रवेश करणारे भारताचे तीन खेळाडू होते भांब्री, बोलिपल्ली आणि बालाजी.
भारताच्या युकी भांब्री आणि चीनच्या जियांग शिन्यू यांनी ‘विम्बल्डन’ २०२५च्या मिश्र दुहेरी स्पर्धेत सहभाग घेतला. तथापि, ‘विम्बल्डन’ ही कदाचित भारतीय टेनिस चाहत्यांच्या मनात सर्वांत जास्त रुजलेली ‘ग्रॅण्ड स्लॅम’ स्पर्धा होती, याचे कारण काही प्रमाणात त्याचा वारसा आणि अलीकडच्या दशकातील यश! लिएंडर पेसने पाच दुहेरी जेतेपदे, महेश भूपतीने तीन आणि सानिया मिर्झाने एक जेतेपद या स्पर्धेत मिळवले आहे. यावेळी भांब्री, बोपण्णा, बालाजी आणि बोलिपल्ली दि. २३ जून ते दि. १३ जुलै २०२५ रोजी, हाच वारसा पुढे नेण्याची आशा करत होते. तथापि, भारतीयांना त्यांनी निराशच केले.
जेनिक सिनर विजेता
‘विम्बल्डन’ २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी पुरुष एकेरी प्रकारात, स्पॅनिश कार्लोस अल्काराझ आणि इटालियन जेनिक सिनर हे दोन्ही स्टार खेळाडू आमने-सामने आले होते. दोन्ही खेळाडूंमध्ये जेतेपदासाठी जोरदार लढत पाहायला मिळाली. शेवटी या सामन्यात जेनिक सिनरने बाजी मारत, पहिल्यांदाच ‘विम्बल्डन’ चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.
इगा स्वियातेक विजेतीपोलंडची इगा स्वियातेक ‘विम्बल्डन’ची विजेती ठरली. इगा स्वियातेकने ‘विम्बल्डन’ २०२५ महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून, ऐतिहासिक कामगिरी केली. सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आठव्या मानांकित स्वियातेकने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाला ६-०, ६-० असे हरवून, तिचे पहिले ‘विम्बल्डन’ विजेतेपद आणि एकूण सहावे ‘ग्रॅण्ड स्लॅम’ विजेतेपद पटकावले.
११४ वर्षांत पहिल्यांदाच अंतिम फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी महिला खेळाडू एकही सेट जिंकू शकली नाही. २४ वर्षीय स्वियातेकने अंतिम फेरीत एकतर्फी कामगिरी करत, अनिसिमोवाला फक्त ५७ मिनिटांत हरवले. १९११ नंतर ‘विम्बल्डन’ महिला एकेरीच्या अंतिम फेरीत हा पहिलाच ६-०, ६-० असा एकतर्फी विजय आहे. यामुळे हा सामना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत एकतर्फी जेतेपदाच्या सामन्यांपैकी एक गणला गेला.
सचिनचे ‘ग्रॅण्ड स्लॅम’ सॅण्डविचभारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात होता. त्याआधी भारतीय क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकरच्या पोट्रेटचे अनावरण, लॉर्ड्सवरील ‘एमसीसी’ संग्रहालयात करण्यात आले. ते यावर्षीच्या अखेरीपर्यंत संग्रहालयात राहणार आहे. त्यानंतर ते पॅव्हेलियनमध्ये हलवण्यात येणार आहे. ‘एमसीसी’ संग्रहालयात असलेले हे पाचवे भारतीय खेळाडूंचे पोट्रेट आहे. त्यातील चार (कपिल देव, बिशन सिंग बेदी, दिलीप वेंगसरकर आणि तेंडुलकर) ही पोट्रेट राईट यांनीच काढली आहेत.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या लॉर्ड्सच्या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरु होता. या ऐतिहासिक मैदानाच्या परंपरेनुसार, मास्टर सचिन तेंडुलकरने घंटा वाजवल्यावर सामना सुरू करण्याची घोषणा केली. भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला ’अॅण्डरसन-तेंडुलकर’ या दोन दिग्गजांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्याआधी क्रिकेटच्या देवाचा अर्थात सचिन तेंडुलकरचा खास सन्मानही करण्यात आला.
‘विम्बल्डन’मध्ये स्ट्रॉबेरी आणि क्रीमपेक्षा आणखीन गोड काय असू शकते? ‘ग्रॅण्ड स्लॅम सॅण्डविच’च्या मध्यभागी स्वतःला बघत आहे. ‘एस’वरील एका पोस्टमध्ये मास्टर ब्लास्टरने फेडरर आणि स्वीडिश टेनिस तेव्हा त्याने स्मितहास्य देत कॅप्शन दिले होते ‘ग्रॅण्ड स्लॅम सॅण्डविच.’
सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही यावर्षीच्या टेनिस चॅम्पियनशिपला हजेरी लावली. सारा तेंडुलकरही ‘विंबल्डन’ २०२५ मध्ये तिच्या शालिनतेने आणि संयमाने सर्वांचे लक्ष वेधून घेत, चर्चेत होती. ‘विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने टेनिस, स्टाईल, लावण्य, स्ट्रॉबेरी, आईस्क्रीम यांच्यात रमलेले भारतीय क्रीडा आणि चित्रपट सृष्टीतील तारे-तारका लंडनमध्ये दिसले.
सेलिब्रिटींचे सेलिब्रेशनयावर्षीच्या ‘विम्बल्डन’ला भारतीय टेनिसपटूंपेक्षा ‘भारतीय सेलिब्रिटींनी गाजवलेला महोत्सव’च आपण म्हणू शकतो. भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असल्याने, ‘विम्बल्डन’ भेट ही त्यांच्या प्रियजनांबरोबर त्यांनी एक साधलेली पर्वणीच होती. क्रिकेटपटू दीपक चाहर हा त्याच्या पत्नी जया भारद्वाजसह तेथे जाऊन आला. ऋषभ पंत रॉयल बॉसमध्ये दिसला. स्ट्राईप्ड सूट आणि शेड्स परिधान केलेल्या भारताच्या कसोटी उपकर्णधाराने, जागतिक स्पर्धेत जणु काही ‘फॅशन शो’त सहभाग घेतला होता. भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवही स्टाईलमध्ये आढळला. भारताचा स्टार क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांनीही ‘विम्बल्डन’ २०२५ मध्ये आपल्या उपस्थितीने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. नीना गुप्ता आणि तिची फॅशन डिझायनर मुलगी मसाबादेखील सेंटर कोर्टवर दिसल्या. माजी व्यावसायिक टेनिसपटू हिमानी मोरशी, विवाहित ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा यानेही ‘विम्बल्डन’ २०२५च्या अंतिम फेरीत हजेरी लावली. जावेद अख्तर, फरहान अख्तर, शिबानी अख्तर, ‘ग्लोबल फॅशन आयकॉन’ सोनम कपूरही पॅन्टसूटमध्ये दिसली. जान्हवी कपूर-शिखर पहारीया ही जोडी, विराट कोहली-अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा-निक जोनास, तसेच अवनीत कौरही तेथे होती. मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर, बॉलिवूडची प्रीती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ, जॅकलिन फर्नांडिस या अभिनेत्रीने अडीच-तीन लाखांचा पांढरा पॅन्टसूट आणि ‘बोटेगा व्हेनेटा लच’ परिधान केला होता. उर्वशी रौतेलाने एक-दोन नव्हे, तर चार बाहुल्यांनी सजवलेल्या बॅगेत आकर्षक पोशाख परिधान करून, लक्ष वेधून घेतले. यातील काही तारे-तारका महिला एकेरीच्या अंतिम फेरीत, तर काही पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चमकताना दिसले. ‘विम्बल्डन’ स्पर्धा बघणे, तारे-तारकांच्या गाठी-भेटी यात रममाण होत सगळ्यांनी मात्र स्ट्रॉबेरी आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेणे काही सोडले नसेल, हे नक्की!
उन्हाचा त्रासदि. १० जुलै २०२५ रोजीच्या गुरुवारी झालेल्या अव्वल क्रमांकाच्या आर्यना सबालेन्का आणि अमांडा अनिसिमोवा यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रेक्षकांना अस्वस्थ वाटत असल्याने, पहिल्या सेटमध्ये दोनदा उशीर झाला. त्यावेळी ‘विम्बल्डन’मध्ये उच्च तापमानाचा परिणाम खेळाडू आणि चाहत्यांनाही जाणवला.
सेंटर कोर्टवरील चाहते खालच्या पातळीवर बसले होते, सावलीत नव्हते आणि दोन्ही वेळा सबालेन्का पाण्याची बाटली देण्यासाठी त्यांच्याकडे गेली. पहिल्यांदाच तिने निळ्या रंगाचा बर्फाचा पॅकदेखील दिला. मला असे वाटते की, लंडन या हवामानासाठी तयार नाही. खूप गरम होते, अनिसिमोवाकडून ६-४, ४-६, ६-४ असा पराभव झाल्यानंतर सबालेन्का म्हणाली, "पहिल्या सेटमधील तापमान ८८ अंश फॅरेनहाइट (३१ अंश सेल्सिअस)पर्यंत पोहोचले. मी कल्पनाही करू शकत नाही की, एकाच ठिकाणी बसून सूर्यप्रकाश सतत तुमच्यावर आदळत असेल, तेव्हा काय होते” असे सबालेन्का म्हणाली. तुम्हाला खरोखर तयार राहावे लागेल, हायड्रेटेड राहावे लागेल. हे सर्वांनाच होऊ शकते. सबालेन्का स्वतः बर्फाचे पॅक वापरत असे, ते डोयावर ठेवत. जेणेकरून तुम्ही खेळ बदलू शकाल. तिने सांगितले की, "विलंबाचा तिच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही. मी माझा खेळ खेळू शकले. कितीही वेळ थांबले, तरी हरकत नाही. मला आशा आहे की, टेनिसच्या चाहत्यांना बरे वाटेल.” गवताच्या कोर्टवरील स्पर्धेतही पहिल्या दिवशी विक्रमी उष्णता अनुभवास आली. त्यावेळी तापमान ९१ अंश फॅरेनहाइट (३३ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढल्याची नोंद झाली आहे.
ओपन एराअनेक दशकांपासून, व्यावसायिक आणि हौशी खेळाडूंना वेगळे ठेवण्यात आले होते, फक्त हौशी खेळाडूंनाच ‘ग्रॅण्ड स्लॅम’सारख्या सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी असे. १९६८ साली ‘ग्रॅण्ड स्लॅम’ स्पर्धांनी (ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन) व्यावसायिकांसाठी आपले दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना हौशी खेळाडूंसोबत, स्पर्धा करण्याची परवानगी मिळाली. या बदलाचा खोलवर परिणाम झाला. टेनिसचे रूपांतर पूर्णपणे व्यावसायिक खेळात झाले आणि त्यामुळे लोकप्रियता आणि बक्षीस रकमेतही वाढ झाली. ’ओपन एरा’मध्ये खेळण्याच्या शैलींमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. अमेरिकेच्या मार्टिना नवरातिलोवा हिच्या नावावर ‘विम्बल्डन’मध्ये सर्वाधिक महिला एकेरी जिंकण्याचा विक्रम आहे. तिच्या नावावर नऊ जेतेपदे आहेत.
तर असे काहीसे चटके सहन करत आईस्क्रीमचा आस्वाद घेत, अनेकांच्या भेटीगाठी घेत किंवा हाऊसफुल्ल ‘विम्बल्डन’ दूरचित्रवाणीवर बघत, हातातील खादाडी करत किंबहूना जेवणाच्या वेळी ताटात काय वाढले जात आहे, त्याकडे दुर्लक्ष करत, अनेकांनी पूर्ण लक्ष केंद्रित ‘विम्बल्डन’वर केंद्रित केले होते. तर टेनिसपटूंच्या ‘ओपन एरा’तील ‘ग्रॅण्ड’ स्पर्धा अशाप्रकारे संपन्न झाल्या.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४