वस्तीपातळीवरील ‘क्वारंटाईन’ची अजब गजब कहाणी

    दिनांक  02-May-2020 23:23:00   
|


qurantine_1  H


मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि त्यामुळे आधीच छिन्नविच्छिन जीवन जगणार्‍या गरिबांचे जगणे आणखीनच असाहाय्य झाले. ज्या वस्तीमध्ये कोरोना पॉझिटिव्हरूग्ण सापडतो, ती संपूर्ण वस्तीच प्रशासनाकडून सीलकेली जाते. तेथील काही लोकांना होम क्वारंटाईन’, तर काहींना क्वारंटाईनस्थळी नेले जाते. नमुन्यादाखल विक्रोळीतील सीलकेलेल्या वस्त्यांचे आणि क्वारंटाईनस्थळाचे हे वास्तव...


दुनिया गोल आहे...

 

पण, प्रत्येकाची वेगळी आहे

क्वारंटाईन व्हायचे आहे, पण प्रत्येकाचे क्वारंटाईन वेगळे आहे

आज काय बनवू,

आज काय खाऊ

कुणाच्या घरी पंचपक्वान्न तर, आज कुठे घरात अन्नाचा कण नाही

कुठून कसा पोहोचला कोरोना

या झोपड्यातही

मरून मरून जगणार्‍यांची

आता मात्र खैर नाही...


त्या सगळ्यांशी बोलून माझ्या मनात या ओळी तरळून गेल्या. विक्रोळी तसा कामगारबहुल परिसर. इथेही कोरोना शिरलाच! आधीच कोषात असलेले लोक अजून कोषात गेले. विक्रोळी गणेश मार्गमध्ये एका चाळीत
पॉझिटिव्हरुग्ण आढळला. त्यानंतर ती चाळ सीलकेली. त्या चाळीतल्या लोकांना सांगितले, “तुम्हाला दोन-चार दिवसासांठी क्वारंटाईनकरावे लागेल.लोकांना हिरानंदानी पवई येथील एका बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आले. पण, काही दिवसांनी त्यांना सांगितले गेले की, “तुम्हाला आणखीन १४ दिवस क्वारंटाईनकेले जाईल.आता या लोकांकडे केवळ दोन दिवसांचेच आवश्यक सामान, कपडे होते. आता १४ दिवस पुन्हा येथे राहायचे, तर कसे राहायचे, असा यांच्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला. या चाळीच्या पुढची चाळही सीलकेलेली. या चाळीतल्या लोकांना होम क्वारंटाईनकेलेले. लॉकडाऊनमध्ये कामधंदा बंदच होता.काही जणांनी उधारीपाधारीवर किंवा थोड्या पैशांनी अन्नधान्य भरलेले. पण
, बहुतेकजण तर बाहेर स्वयंसेवी संस्थांकडून येणार्‍या जेवणावर विसंबून. पण, वस्ती सीलकेल्याने तिथे अन्न पोहोचवणे मुश्किल झाले. बरं, ज्यांची परिस्थिती ठीक आहे, त्यांनासुद्धा त्रासच आहे. कारण, नाशंवत वस्तू जसे दूध, भाजीपाला कुठून घेणार? वस्तीच्या बाहेर जायला परवानगीच नाही. तसेच या वस्तीतले शौचालय काही महिन्यांपूर्वी बहुधा नूतनीकरणासाठी तोडलेले. ज्यांच्या घरात शौचालय नव्हते, ते लोक बाजूच्या वस्तीतले शौचालय वापरत. पण, या वस्तीत कोरोना पॉझिटिव्हरूग्ण सापडला आणि या दुसर्‍या वस्तीतील काही लोकांनी या वस्तीतील लोकांना शौचालय वापरण्यास बंदी केली. त्यानंतर खूप प्रयत्न, मिनतवार्‍या करून, राजकीय दबाव आणून या लोकांना बाजूच्या वस्तीतील एक शौचालय वापरायला मिळाले. आता हे शौचालय वस्तीच्या बाहेर आहे. त्यामुळे ही वस्ती जरी सीलकेली असली, तरी लोकांना शौचालयासाठी वस्तीबाहेर पाऊल टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. यावरून काही लोकांना प्रश्न विचारले की, समजा, एखाद्या वस्तीत कोरोनाचा रूग्ण सापडला, तर तिकडचे सार्वजनिक शौचालयही सीलकेले जाते. वस्तीही सीलकेली जाते. मग हे शौचालय वापरणारे लोक काय करत असतील? यावर एकाचे म्हणणे होते, घरातल्या मोरीचा वापर शौचालयासारखा करावा लागेल. बाप रे, हे तर त्याहूनही भयंक! पण, नाईलाजाला पर्याय नसणारच. वस्ती, वस्तीतले शौचालय सीलकरण्यापूर्वी या गोष्टींचा विचार केला गेला का?पुढे वळूया
, पुढे हरियाली व्हिलेज चार नंबरमध्ये काही चाळींमध्ये एक-दोन कोरोना पॉझिटिव्हरूग्ण मिळाले. मग त्या रूग्णांना उपचारासाठी नेण्यात आले. त्याबरोबर ती चाळ नियमांनुसार सीलकेली. इथल्या लोकांचे म्हणणे असे की, आम्हाला घेऊन जाताना पोलिसांसोबत एक स्थानिक माणूस होता. तो प्रशासकीय अधिकारी नव्हता की पोलीस नव्हता की डॉक्टरही नव्हता; तो बाजूच्या वस्तीतला होता. तो प्रत्येकाला धमकावत होता. चला, महानगरपालिकेच्या गाडीत बसा, असे ओरडत होता. या माणसाने जय शिवराय जय आदिवासीम्हणत प्रसार माध्यमात नंतर बातमीही केली की, “लोक ऐकत नव्हते, पण मी प्रयत्न केले आणि या लोकांना क्वारंटाईनकेले.काहींनी विचारले की, प्रशासन किंवा पोलीस असे कुणाच्या सांगण्यावरूनही लोकांना क्वारंटाईनकरू शकतात का? या वस्तीतील १२ वर्षांच्या आतील मुलांना वस्तीतच ठेवले गेले. त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला त्यांच्या आया घरीच राहिल्या. मग क्वारंटाईनस्थळी गेलेले पुरूष परोपरीने सांगत होते की, “रूग्ण सापडल्यापासून आम्ही घरातच आहोत. जर इथे कोरोनाची भीती आहे, तर मग आमच्या बायकापोरांना घरीच ठेवले, त्यांचे काय? आम्हाला कोरोना झाला किंवा होईल, अशी भीती आहे, तर आमची तर १०-१२ दिवस साधी तपासणीही केली नाही. मग घरातल्या नुसत्या पुरूष माणसाला क्वारंटाईनका केले?”विक्रोळीतील कन्नमवारनगर
, हरियाली व्हिलेज येथे काही वस्त्या सीलकेल्या. घरातल्या पुरूषांना क्वारंटाईनकेले. पोलिसांनी या वस्तीत सांगितले की, “घाबरू नका. काहीही मदत लागली तर नगरसेवक/नगरसेविकेला कॉल करा.इथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक-नगरसेविका आहेत. वस्तीत राहिलेल्या आयाबायांना वाटले की पोलिसांनी सांगितले की, काही मदत लागली तर नगरसेवकांना विचारा. काही व्यवस्था केली असावी. त्यामुळे पुरूष मंडळी घरात नाही, अन्नधान्य संपले, पोराबाळांना दूध लागते, दूध मिळत नाही. त्यासाठी त्यांनी नगरसेवक/नगरसेविकेला संपर्कही केला. त्यावेळी नगरसेवक/नगरसेविकेचे उत्तर होते, “तुम्ही धान्य भरले नाही? तुमची चूक आहे, तुम्ही व्यवस्था करायची होती, आम्ही मदत करू शकत नाही.नगरसेवक किंवा नगरसेविकेने मदतीसाठी हात वर करत असमर्थता व्यक्त केली. कारण, या वेळी काय, कशी मदत करायची याचे नियोजनच नाही, मग नगरसेवक असू देत की आणखी कुणी.पुढची वस्ती टागोर नगर
, पाच नंबरची. इथल्या चाळीतल्या एक व्यक्तीलाही कोरोना संशयितघोषित केलेस आणि चाळीतील लोकांना क्वारंटाईन.यामध्येही घरातील पुरूष माणसांना क्वारंटाईनस्थळी नेले. लहान मुले आणि महिला घरीच. त्यातही ज्या व्यक्तीला संशयितठरवले, त्या व्यक्तीच्या घरातील माणसे तर तिथेच होती. तसेच संशयित व्यक्तीला ३० तासांनी टेस्टिंगसाठी नेण्यात आले. ज्या ठिकाणी या लोकांना क्वारंटाईनकेले ती जागा आहे, हिरानंदानी पवईमधील एसआरएची एक इमारत. जी रिकामी होती. इथे एका खोलीत चार ते पाच माणसे ठेवली आहेत. काही कुटुंबांना एक खोली दिली आहे. कित्येक दिवस लोक क्वारंटाईनस्थितीत या इमारतीमध्ये खितपत पडून आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, शौचालय किंवा खोली स्वच्छ करण्यासाठी काहीच साधनं नाहीत. त्यामुळे अस्वच्छता आहे. एका रूममध्ये तर टॉयलेट आणि बाथरूम तुंबले. ते पाणी या रूममध्ये सर्वत्र पसरले. त्याच्या दुर्गंधीने सगळे हैराण. पाण्याने झोपायला दिलेल्या गादी, उशी असं सगळं काही भिजलं. तसेच यातील काही लोकांना त्वचेचे आजार झाले आहेत. त्यांनी तसे संबधितांना कळवलेही, पण कुणीही त्यांना दाद दिली नाही.नुसत्या
क्वारंटाईनमध्येच घोळ आहे का? तर तसे नाही. परवानगी दाखल काही उदाहरणे पाहा. विक्रोळी पश्चिमेला तर एका क्षयरूग्णाला कोरोना संशयित म्हणून नेले. पण, कित्येक दिवस त्याची चाचणी झाली नाही. काही दिवसांनी चाचणी झाली, त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्हआला. तो माणूस घरी आला, पण अगदी मरणासन्न अवस्थेत. कारण, कोरोना चाचणी करत असताना त्याच्या क्षयरोगावरच्या गोळ्या बंद होत्या. दुसरी गोष्ट, विक्रोळीतील शुश्रूषा रुग्णालयाची, जे आता कोविडसाठी सुरू केले आहे. पण, या रुग्णालयात गरोदर महिलांनी चार महिन्यांआधी नाव नोंदवलेले. इथे डायलिसीस रूग्णही येतात. पण, हे रुग्णालय कोविडसाठी राखीव म्हणून घोषित झाले. जेव्हा प्रसारमाध्यमांत यासंदर्भात बातमी आली, तेव्हा इथे उपचार घेणार्‍या लोकांना ही गोष्ट कळली.पण
, अचानक या लोकांनी डायलिसीससाठी किंवा महिलांनी प्रसुतीसाठी कुठे जायचे? लोकांच्या प्रश्नांना कुणीही उत्तर देत नाही. पुन्हा मुद्द्याकडे वळू की, लोकांना राहायला छप्पर आणि दोनवेळचे जेवण दिले म्हणजे क्वारंटाईनहोते का? लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळणे, अनिश्चिततेमुळे ते मनाने खचले आहेत तर त्यांचे काही सामुदायिक का होईना मनोरंजन होईल, अशी काही सुविधा उपलब्ध करून देणे, ते जिथे राहतात, ती जागा स्वच्छ राहील, यासाठी साहित्य पुरवणे. हे सगळे कोण करणार? तसेच तुम्ही इथे आहात. तुमचे कुटुंब वस्तीत आहे, तर त्यांना सगळ्या सुविधा पुरवत आहोत, याची खात्रीही कोण देणार? तसेच वस्तीपातळीवर विघातक प्रवृत्तीचे ही काही लोक दबा धरुन आहेतच. समाज आणि देश, लोकशाहीच्या नावाने बोट मोडणारी लोक. हेही सक्रिय झाले आहेत. क्वारंटाईनकेलेल्या लोकांसोबत हेसुद्धा असतील, तर हे लोक काय काय उद्योग करत असतील, हे ही पाहायला हवे.
क्वारंटाईनस्थळी नेमके काय होत आहे, याचा अहवाल, तपासणी होते का, हेही लोकांना माहिती नाही. या क्वारंटाईनस्थळांची देखरेख, पाहणी करण्यासाठी समाजशील आणि खर्‍या अर्थाने संवेदनशील असलेल्या व्यक्ती, संस्था यांची मदत घ्यायला काय हरकत आहे? केवळ आम्ही कोरोनाशी लढण्यासाठी वस्तीतील लोकांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनकेले, असे म्हणणे म्हणजे या गरीब आणि निराश लोकांशी प्रतारणा करण्यासारखेच होईल. या लोकांचा प्रशासन, राज्य सरकार, लोकशाही आणि त्यातही माणुसकीवरचा विश्वास संपत चालला आहे. त्यांचा विचार कोण करणार? ‘आम्ही मरणारच आहोत, राज्य सरकार काहीच करणार नाही,’ असे ज्यांना वाटते, त्याला काय उत्तर आहे? जो सधन, संपन्न आणि समर्थ आहे, तो जगण्याची सुविधा कदाचित उपलब्ध करेल. पण, मुंबईतल्या या ५५ टक्के झोपडपट्टी वस्त्यांचे जर असे क्वारंटाईनहोत असेल, तर मात्र सगळेच कठीण आहे. त्यामुळे पुन्हा मनात तेच येते की,

क्वारंटाईनव्हायचे आहे,

पण, प्रत्येकाचे क्वारंटाईन

वेगळे आहे...


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.