विठुराया पाहतो आहेस ना सर्व...

    09-Nov-2020   
Total Views | 153

Temple_1  H x W
 
“मंदिरं का उघडत नाहीत तर मंदिरात तल्लीन झाल्यास कोरोना पसरतो,” असे वाक्य महामहिम ‘ब्येष्ट शिएम’नी केले आहे. त्यांचे विधान ऐकून त्यांच्या सत्तेचे भागीदार राहूल गांधी यांचेही विधान आठवले. ते म्हणाले होते, “मंदिर में लोग लडकी छेडने जाते हैं.” त्यांचे विधान आठवण्याचे कारण की मंदिरात ना लोक मुलींना छेडायला जातात ना तल्लीन होऊन कोरोना पसरवायला जातात. मंदिर म्हणजे थकल्याभागल्या जीवांना दिलासा देणारे पवित्र स्थान. देवधर्म आहे आणि आम्ही एकटे नसून ते आम्हाला तारणारच, असा विश्वास देणारे स्थान. कोरोना आणि दडपशाही युक्त राजकीय-सामाजिक वातावरणात महाराष्ट्रातील जनतेला सर्व काही ठीक होईल, असे वाटण्यासाठी श्रद्धास्थान हवेच. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत देवावर हवाला सोडलेल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेने मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.
 
 
हॉटेल, बार आणि इतर तमाम गोष्टी उघडल्या आहेत. मात्र, मंदिरं उघडली नाहीत. मंदिरात लोक तल्लीन झाली, तर कोरोना पसरेल, असे जे विधान मुख्यमंत्री महाशयांनी केले आहे. त्यावर लोकांचे म्हणणे आहे की, दारू आणि बारमध्ये लोक बेवडे बनतात, शुद्ध हरपून गैरकृत्य करतात, तेव्हा काय कोरोना पसरत नसतो? बार हे कोरोनाचे दोस्त आहेत का? म्हणून कोरोना बारमध्ये गर्दी करणार्‍या लोकांना होत नाही आणि मंदिरात गेलेल्या लोकांनाच होतो? मुख्यमंत्री महोदय, मंदिरापेक्षा दारूच्या अड्ड्यांवर जास्त गर्दी असते. जरा घराबाहेर लोकांच्यामध्ये जाऊन पाहा. मग कळेल की गर्दी आणि मुद्दामहून संसर्गजन्य आजार पसरवण्याचे उद्योग कुठे बिनबोभाट सुरू आहेत ते. मंदिरात जाणारे विशिष्ट धर्माचेच लोक असतात आणि बहुसंख्यपणे ते कायदा-सुव्यवस्था आणि संविधानाला माननारे पापभिरूच असतात. त्यामुळे मंदिरात जाऊन तल्लीन होऊन कोरेाना पसरवायचा ते विचार करणारच नाहीत. पण आता असे आहे ना की, ढवळ्या-पवळ्याची संगत झाली की, वाण लागत नसतो पण गुण लागतो. त्यामुळे आता देवळे-मंदिरे हे तारणहार, धार्मिक शक्तिस्थान न वाटता, कोरोना पसरवण्याची केंद्र वाटू लागली आहेत. असो, या विधानाने देवधर्माला शिव्याशाप देणार्‍यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. देवधर्म आणि देवळाबाबत असे विधान करणारे सत्ताधारी महाराष्ट्राला मिळाले दुर्दैव म्हाराष्ट्राच्या जनतेचे! विठुराया पाहतो आहेस ना सर्व...
 
 
मुख्यमंत्रिपद दान करणारे दानवीर
 
 
मी भल्या-भल्यांना मुख्यमंत्रिपद दान करत असतो. त्यामुळे असे समजा की, उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असलेले हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले - एकनाथ खडसे. थोडक्यात, महाराष्ट्रात विनोदवीरांची कमी नाही. या विनोदवीरांचे आभार मानावे तेवढे थोडेच. नाहीतर महाराष्ट्रात सोडा जगभर कोरोनाची विषण्ण छाया आहे, लोक निराश झालेत. बातम्या पाहाव्यात तर त्यात कोरोना कोरोना आणि मनोरंजनाचे पाहावे तर त्यात हिरो-हिरोईनचे ‘दम मारो दम’ किंवा ‘कश पे कश’चा खरा जीवनपट डोळ्यासमोर येतो, मग आपसूकच मनोरंजन एक सजा होऊन जाते. त्यामुळे लोकांना जीव कुठे रमवावा कळतच नव्हते, नाही म्हणायला स्थगिती सरकारने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हसण्याचे असंख्य बहाणे दिले. त्याबाबत तर ‘आलू से सोना’फेम राहुलबाबांचा पण रेकॉर्ड मोडला, त्यामुळे फेसबुक लाईव्ह आले की लोक सज्ज होऊन हसण्यासाठी बसत असत. आता त्याच विनोदी मालिकेच्या परंपरेत नवीन भिडू आलेत. त्यापैकी एक ब्राह्मणांना मुख्यमंत्रिपद दान केले म्हणणारे.
 
 
यांच्या वक्तव्याला विनोद म्हणावा नाही तर काय म्हणावे? एकनाथ खडसे. यांनी स्वत:च्या कन्येला आमदारकी दान केली असती तर बरे झाले असते. कारण, मुख्यमंत्रिपदाचे दान करणार्‍यांना ‘आमदारकी किस झाड की पत्ती...’ पण तरीही कन्येला आमदारकी दान केली नाही. मात्र, मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, असे म्हटले. मग असा प्रश्न येतो की, जात पाहूनच हे दान करणार? अरेरे! जातीअंताची लढाई लढण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र नेहमी अग्रेसर होता. पण जातीवरच समस्त सत्ता भोगणारे लोक आज सत्तेची मलई खाण्यासाठी जातीजातींची माती खाण्यासाठी सज्ज आहेत, आम्ही अमुक जातीचे म्हणून आमच्यावर अत्याचार झाला, असा कांगावा करणारे हे लोक स्वत: जातीवाचक अपमान सहज करतात. तेव्हा आपण संविधान कायद्याचा अपमान झाला किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी आणि समस्त महापुरूषांनी दिलेल्या समता-समरसता मूल्यांचा अपमान झाला असे अजिबात समजायचे नाही आणि समजलात तरी बोलायचे नाही बरं का! कारण, जातीपातीवरून गरळ ओकण्याचे अधिकार हक्क या जातीपातीचे राजकारण करणार्‍या नेत्यांनाच आहेत.
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121