हिंदू नववर्षदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशिमबागेत

माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी; दीक्षाभूमीलाही देणार भेट

    28-Mar-2025   
Total Views | 26

Narendra Modi at Reshimbaug
 
नवी दिल्ली : (Narendra Modi at Reshimbaug) हिंदू नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याला (३० मार्च रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) मुख्याल रेशिमबाग येथे भेट देणार आहेत. हिंदू नववर्षानिमित्त रा. स्व. संघाने 'प्रतिपदा' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिरास भेट देऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांना आदरांजली वाहतील.

हे वाचलंत का? : zमराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास प्रसिद्ध करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी माधव नेत्रालय नेत्र चिकित्सा आणि संशोधन केंद्राच्या नवीन विस्तारित इमारतीची म्हणजे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करतील. २०१४ मध्ये स्थापन झालेले हे नेत्रालय नागपूरमधील एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग सेवा सुविधा केंद्र आहे. गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था स्थापन करण्यात आली होती. नव्या प्रकल्पात २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग संबंधित सेवा प्रदान करणे आहे, हा यामागील उद्देश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह १९५६ मध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्या दीक्षाभूमीला भेट देऊन पंतप्रधान आदरांजली वाहतील.

दारुगोळा केंद्रासही देणार भेट
पंतप्रधान मोदी नागपुरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा केंद्राला भेट देणार आहेत. नि:शस्त्र हवाई वाहनांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद हवाई पट्टीचे आणि लोइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामग्रीची चाचणी घेण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचे उद्घाटन करतील.

संघ मुख्यालयात जाणारे दुसरे 'स्वयंसेवक पंतप्रधान'
संघ मुख्यालयात जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे स्वयंसेवक पंतप्रधान ठरणार आहेत. यापूर्वी २७ ऑगस्ट २००० रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी संघ मुख्यालयास भेट दिली होती.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121