आगामी जनगणनेसोबत एनआरसी देखील आवश्यक!

पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या स्लिपर सेलसह हाकलून लावा; विहिंपची मागणी

    02-May-2025
Total Views | 14

VHP demands to launch NRC regarding Pakistani Migrants issue

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (NRC regarding Pakistani Migrants issue)
भारतात नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) तयार करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी आणि पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या स्लीपर सेलसह सीमेपलीकडे हाकलून लावावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. विहिंपचे केंद्रीय संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन याविषयी बोलताना म्हणाले की, जो कोणी भारताचा अधिकृत नागरिक नाही, त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदार कार्ड पूर्णपणे तपासले पाहिजे आणि ते रद्द केले पाहिजे आणि या लोकांना भारतातून हाकलून लावले पाहिजे. येणाऱ्या जनगणनेसोबतच एनआरसी देखील तयार करणे तितकेच आवश्यक आहे.

हे वाचलंत का? : पारंपारिक आणि डिजिटल माध्यमांच्या एकत्रीकरणामुळे क्रांतिकारी बदल

पहलगाममध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी हिंदूंच्या क्रूर हत्याकांडानंतर केंद्र सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे अनेक देशविरोधी कट रचणारे कारस्थान उघडकीस येत आहेत, जे दशकांपासून देशाची मुळे पोकळ करत असल्याचे सुरेंद्र जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, "सद्यस्थिती पाहता लाखो महिला पुढे आल्या आहेत ज्यांचे पती पाकिस्तानी मुस्लिम आहेत आणि त्यांच्याकडे त्या देशाचे पासपोर्ट देखील आहेत. पण त्या महिला आणि त्यांची मुले भारताचे नागरिक आहेत. त्याचबरोबर अशी हजारो प्रकरणे आहेत ज्यात एका भारतीय मुस्लिम महिलेने पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केले आणि स्वतः पाकिस्तानी नागरिकत्व घेतले, परंतु तिच्या मुलांसाठी भारतीय नागरिकत्व मिळवले. हे सर्व लोक केवळ भारतात उपलब्ध असलेल्या सुविधांचा फायदा घेत नाहीत तर भारताच्या पैशावर भरभराट करून भारताच्या मुळांवरही हल्ला करत आहेत, असा आरोप विहिंपकडून करण्यात आला आहे.

पुढे ते म्हणाले, दुर्दैवाने काही लोक अशा कटकारस्थानांना रडताना दाखवून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की या देशद्रोही लोकांचे हे कारस्थान गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे आणि लाखो महिलाही त्यात सामील आहेत. जिहादी-धर्मनिरपेक्ष शक्तींचे अपवित्र संगनमत देखील त्यांना मदत करत आहे. आता ते उघडकीस आले आहेत, ते सहानुभूतीला पात्र नाहीत तर भारतातून हद्दपार होण्यास पात्र आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121