स्किल इंडिया साठी ८ हजार ८०० कोटींची तरतूद- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळही वाढवला

    08-Feb-2025
Total Views | 19
 
 
 
skill india
 
नवी दिल्ली : मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मान्यता दिली आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की यामध्ये स्किल इंडिया कार्यक्रमासाठी ८ हजार ८०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे.
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीसाठी ८ हजार, ८०० कोटी रुपयांच्या खर्चासह २०२६ पर्यंत ‘स्किल इंडिया’ प्रोग्राम सुरू ठेवण्यास आणि पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे देशभरातील भविष्यासाठी तयार कुशल, मागणी-आधारित, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि औद्योगिकदृष्ट्या प्रशिक्षित तरुण तयार होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “या योजनेअंतर्गत ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.०’ (पीएमकेव्हीवाय ४.०), ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना’ (पीएम-एनएपीएस) आणि ‘जनशिक्षण संस्थान’ (जेएसएस) योजना विलीन करण्यात आल्या आहेत. आता या तिन्ही योजना ‘स्किल इंडिया’ कार्यक्रमाचा एक भाग असतील,” असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सांगितले.
“केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगा’चा कार्यकाळ दि. ३१ मार्च रोजीनंतर तीन वर्षांसाठी वाढविण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे. तीन वर्षांच्या मुदतवाढीमुळे सरकारी तिजोरीवर ५०.९१ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. स्वच्छता कामगारांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी, स्वच्छता क्षेत्रातील कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि धोकादायक स्वच्छता कामे करताना मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयोग मदत करेल,” असे वैष्णव म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्व किनारपट्टी रेल्वेमध्ये रायगडला एक नवीन विभाग बनवण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे. रायगड विभागाची स्थापना झाल्यामुळे, रेल्वे प्रशासनाचे काम सोपे होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाने नवीन आयकर विधेयकालाही मान्यता दिली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121