सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेची भेट! चर्चांना उधाण

    14-Feb-2025
Total Views | 89
 
Suresh Dhas
 
बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची माहिती पुढे आली असून या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने त्यांची भेट घेतली असल्याचे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
 
सुरेश धस म्हणाले की, "धनंजय मुंडे यांचे ऑपरेशन झाले आहे. त्यादिवशी रात्री त्यांना दवाखान्यात अॅडमिट करण्यात आले. दुसऱ्या दिवशी झाकून-लपून नाही, तर त्यांच्या निवासस्थानी मी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस आणि संतोष देशमुखांच्या हत्येबाबतचा लढा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार आहोत. तब्येतीची चौकशी करण्यात गैर नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचंलत का? -  छोट्या छोट्या प्रयत्नांतून शाश्वत विकास गाठणे शक्य होणार! मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
 
ते पुढे म्हणाले की, "मी अजून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांच्या पक्षाचेच लोक आणि इतर लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हे अजित पवार यांच्या हातात आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आम्ही चार तास सोबत होतो. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही. ते दोघेही भावनिक आहेत. काही विषयांवर त्यांच्यात मतभेद असून लवकरच ते दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्या दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121