"मनात आलं की वक्फची प्रॉपर्टी घोषित करता! उद्या म्हणाल लाल किल्ला ताजमहाल पण द्या!", न्यायमूर्ती संतापले
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाचा दावा केला खारीज
07-Aug-2024
Total Views | 80
भोपाळ : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकतीच वक्फ बोर्डाप्रकरणी (Waqf Board) सुनावणी केली. यावेळी मध्य प्रदेशचे न्यायमुर्ती गुरूपाल सिंह अहलूवालिया यांनी संबंधित वक्फ बोर्डाच्या वकिलांना चांगलेच फटकारले आहे. ते म्हणाले की, "उद्या जर आपल्या मनात आले तर आपण ताजमहल, लाल किल्ला हा भारत वक्फ बोर्डचा असल्याचा दावा कराल", असे म्हणत त्यांनी वक्फ बोर्डाच्या वकिलांना सुनावले. वक्फ बोर्डाच्या संपत्तीप्रकरणी संबंधित वकिलांना कोणतीही ठोस माहिती दिली नसल्याने गुरूपाल यांनी फटकारले.
मध्य प्रदेश न्यायालयाने ऐतिहासिक मालकीचा दावा करणारा वक्फ बोर्डाचा दावा करणारा हा आदेश रद्द केला आहे. यामध्ये शाह शुजाचा मकबरा, नादिर शाह, बीबी साहिब मशीद आणि बरहानपूर किल्ल्यातील एका राजवाड्यांचा समावेश होतो. वक्फ बोर्ड मुस्लिम धर्मास्थळांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करते. यासाठी आता वक्फ बोर्डाने विशिष्ट वास्तुंच्या संपत्तीबाबत मालकी हक्क दाखवण्याचा दावा केला. यावेळी वकिलांना कोणतीही स्पष्टोक्ती दिली नसल्याने न्यायमुर्ती गुरूपाल सिंह यांनी फटकारले असून ते म्हणाले की, जर अशाप्रकारे वक्फ बोर्डाला संपत्ती देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्यास येणाऱ्या काळात वक्फ बोर्ड ताजमहाल आणि लाल किल्ला स्वत:चा असल्याचा दावा करेल, असे म्हणत त्यांनी वक्फ बोर्डाच्या वकिलांचा समाचार घेतला आहे.
न्यायमुर्ती अहलुवालियांची तिखट टिप्पणी?
न्यायमुर्ती अहलुवालियांनी वकिलांना अनेक प्रश्न केले होते. मात्र, वकिलांना त्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. ऐतहासिक स्मारकांचे संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. याला कोणत्या विशिष्ट जाती-धर्मात वाटून घेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. उद्या जर आपल्या मनात आले तर आपण ताजमहल, लाल किल्ला हा भारत वक्फ बोर्डचा असल्याचा दावा कराल, असे म्हणत त्यांनी वक्फ बोर्डाला फटकारले आहे.