नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भीषण विमान अपघात; ८ जणांचा मृत्यू

    24-Jul-2024
Total Views | 39
 nepal
 
काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडू येथे बुधवार, दि. २४ जुलै २०२४ एक मोठा विमान अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण भरताना कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
 
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान पोखराला जात होते. या विमानात कर्मचाऱ्यांसह १९ लोक होते. सकाळी अकराच्या सुमारास हे विमान कोसळले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे.
  
विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, विमानाच्या पायलटला रुग्णालयात नेण्यात आले आहे. विमानातील आग विझवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. सध्या प्रवाशांच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.
 
विमान धावपट्टीच्या दक्षिणेकडील टोकावरून उड्डाण करत असताना अचानक ते पलटले आणि पंख जमिनीवर आदळले, त्यामुळे विमानाला लगेच आग लागली. त्यानंतर ते धावपट्टीच्या पूर्वेकडील बुद्ध एअर हँगर आणि रडार स्टेशन दरम्यानच्या खड्ड्यात पडले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमानतळावर धुराचे दाट लोट दिसत आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121