केरळचे मुख्यमंत्री भाजपचा अजेंडा राबवत आहेत – काँग्रेसचा आरोप

    20-Jun-2025
Total Views |

Kerala Chief Minister is implementing BJP agenda
 
नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि कांग्रेस नेते व्ही.डी. सतीसन यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) भाजपशी संधान असल्याचा आरोप केला. त्यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर केरळमधील मुस्लिम बहुल जिल्हा असलेल्या मलप्पुरममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (रा. स्व. संघ) अजेंडा राबवित असल्याचाही आरोप केला आहे.
 
ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवरील बांधकामामुळे राज्यात असंख्य अपघात झाले असले तरी, एलडीएफ सरकारला केंद्र सरकारविरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती. यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे संगनमत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे मलप्पुरममधील जवळजवळ सर्व लोक गुन्हेगार, तस्कर आणि संशयास्पद कारवाया करणारे आहेत, अशीही भाषा राज्य सरकार बोलत आहे. यावरून रा. स्व. संघासोबतही संगनमत करून त्यांचा अजेंडा मुख्यमंत्री विजयन राबवित असल्याचेही सतीसन यांनी म्हटले आहे.
 
मलप्पुरम जिल्ह्यातील निलंबुर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान सतीसन यांचे हे विधान आले. पोटनिवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यासह एलडीएफ नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफवर जमात-ए-इस्लामीचा त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल टीका केली. प्रत्युत्तर देताना, यूडीएफ नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर इस्लामोफोबिया भडकवण्याचा आरोप केला.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!