सुप्रसिद्ध लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहिर!

    20-Jun-2024
Total Views |
Aruna Dhere

सांगली :
कवयित्री व साहित्याच्या अभ्यासिका डॉ. अरूणा ढेरे यांना 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान' जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार ढेरे राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अकादमीचे निमंत्रक आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

याव्यतिरिक्त शैली शास्त्रीय समीक्षेतील गुणवत्तापुर्ण योगदानाबद्दल प्रसिद्ध समीक्षक डॉ. दिलीप धोंडगे, साहित्यातील गुणवत्तापुर्ण अनुवादाकरिता प्रसिद्ध अनुवादक आणि कवी डॉ. सचिन केतकर, प्रायोगिक रंगभूमीवरील योगदानाकरिता दिग्दर्शक अतुल पेठे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कराचे वितरण दि. ३० जून रोजी करण्यात येणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121