लग्नात डान्स करण्याची शिक्षा, ११ महिने बहिष्कार अन् १ लाख दंड! मौलानाचा रशिदच्या कुटुंबाविरोधात फतवा
22-May-2024
Total Views | 41
भोपाळ : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. बहिष्काराचा हा आदेश स्थानिक मौलानाने दिला आहे. पीडित कुटुंबाचा दोष एवढाच की, त्यांच्या निकाह समारंभात एका नर्तिकेने डान्स केला होता. बहिष्काराची घोषणा करणाऱ्यांनी याला धार्मिक प्रथांच्या विरोधात म्हटले आहे. कुटुंबाला समाजातून काढून टाकण्याची मुदत सध्या ११ महिन्यांवर ठेवण्यात आली आहे. यासोबतच कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकरण हरदाच्या छिपनेर रोडचे आहे. रशीद आपल्या कुटुंबासह येथे राहतो. दि. २८ जानेवारीला रशीदच्या कुटुंबातील सदस्याचा विवाह पार पडला. लग्नात वराचे नाव मोहीन आणि वधू चांदनी होती. दोन दिवसांनी म्हणजे दि. ३० जानेवारीला रशीदने या लग्नाच्या सेलिब्रेशनसाठी पार्टी आयोजित केली होती. या मेजवानीत रशीदचे नातेवाईक आणि मित्रांव्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक सहभागी झाले होते.
या लग्नासाठी राशिदने राजस्थानी कलाकारांना आमंत्रित केले होते. या कलाकारांमध्ये एका महिला नर्तिकेने घूमर नृत्य केले. या डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राजस्थानी पोशाखात एक महिला नृत्यांगना अनेक लोकांसमोर स्टेजवर नाचत होती. राजस्थानच्या पारंपारिक पोशाखात स्टेजवर एक माणूस दिसत आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर रशीद यांच्या परिसरातील काही मौलाना आणि इतर मुस्लिम समाजातील लोकांनी बैठक घेतली.
निकाहमध्ये महिलांचे नृत्य करणे नियमांच्या विरोधात असल्याचे बैठकीत एकमताने जाहीर करण्यात आले. त्यासोबतच त्यांच्यावर ११ महिन्याचा बहिष्कार आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मौलानाच्या निर्णयाविरोधात रशीद यांनी हरदाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (डीएम) तक्रार पत्र देऊन न्यायाची मागणी केली. त्यांनी आरोप केला आहे की, ११ महिने कोणत्याही लग्नाला आमंत्रित न करण्याचे आदेश त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहेत.
तसेच पीडितेच्या कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राशिदच्या वृद्ध आईने हा आदेश चुकीचा असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाविरोधात पीडितेचे कुटुंबीय पोलिसांत गेले. पोलिसांनी बहिष्कार टाकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे. अखेर रशीदने हरदाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ एक पथक रशीदच्या घरी आणि शेजारच्या भागात तपासासाठी पाठवले. रशीदच्या शेजाऱ्यांनी बहिष्कार सारखे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की रशीदवर बहिष्कार घालण्यात आलेला नसून त्याला कार्यक्रमांमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.