लव्ह जिहाद! 'अनस'ने केली 'एकता'ची चाकू भोसकून हत्या

    09-Apr-2024
Total Views | 166
 ekta
 
चंदीगढ : अनसने शनिवार, दि. ६ एप्रिल २०२४ पंजाबमधील एसएएस नगर (मोहाली) खरार भागात एकताची चाकूने भोसकून हत्या केली. अनस नंतर कारने येथून पळून गेला पण त्याच्या कारला ८० किलोमीटर अंतरावर अपघात झाला. मोहालीपासून ८० किमी अंतरावर हरियाणातील शाहाबादजवळ हा अपघात झाला.
 
एकताच्या हत्येप्रकरणी तिचा लहान भाऊ रोहित याने खराड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनस कुरेशीविरुद्ध कलम ३०२ (हत्या)चा गुन्हा दाखल केला आहे. रोहितने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो सनी एन्क्लेव्ह भागातील रहिवासी आहे आणि आपल्या कुटुंबासह येथे राहतो.
 
 
येथे त्याचा मोठा भाऊ सुखचैन, मयत एकता, त्याची आई आणि ते स्वतः एकत्र राहत होते. एकता २७ वर्षांची होती. एकता गेल्या ३-४ वर्षांपासून खासगी नोकरी करते. काही रिपोर्ट्समध्ये ती एका मल्टीनॅशनल कंपनीत जनरल मॅनेजर असल्याचं म्हटलं होतं. रोहितने फिर्यादीत म्हटले आहे की, एकताचे जमीरुद्दीनचा मुलगा अनस कुरेशी याच्यासोबत गेल्या ३-४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अनस हा मुरादाबादचा रहिवासी होता.
 
चंदीगडमध्ये, तो दादू माजरा गावात राहत होता आणि चंदीगडच्या सेक्टर ३८ मध्ये एक ढाबा चालवत होता. अनस आणि एकता कधी कधी एकत्र राहत होते. काही महिन्यांपूर्वी एकताने रोहितला सांगितले होते की, अनससोबत तिचे नाते चांगले चालत नाही. हे सांगितल्याने अनस संतापला. रोहितने सांगितले की, एकता तिच्या नात्यातील अडचणींमुळे नाराज होती.
 
 
रोहितने सांगितले की, दि. ५ एप्रिलच्या रात्री त्याच्या सासरच्या गावात जवळच एक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला होता. रोहितने एकताला सोबत येण्यास सांगितले, मात्र अनस तिला भेटायला येत असल्याचे सांगून तिने नकार दिला. यानंतर कुटुंबीय एकताला सोडून फंक्शनला गेले. दि. ६ एप्रिल रोजी सकाळी सर्वजण घरी परतले असता त्यांना एकताची कार बाहेर उभी नसून दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्याने एकताला फोन केला तरी तिने प्रतिसाद दिला नाही.
 
यानंतर रोहित आतमध्ये गेला असता त्याच्या बेडरूममध्ये एकताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. एकताच्या मानेवर खोल जखमेच्या खुणा होत्या. रोहितने तक्रारीत म्हटले आहे की, “मला पूर्ण खात्री आहे की अनस कुरेशीने माझी बहीण एकताची हत्या केली आहे. ५-६ एप्रिलच्या रात्री अनस कुरेशीने एकताचा खून केला आणि तिची कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
 
रिपोर्ट्सनुसार, अनस रात्री अडीचच्या सुमारास एकताच्या घरात जाताना दिसला. तीन तासांनंतर अनस वेगळ्या कपड्यात घराबाहेर आला आणि एकताची कार घेऊन पळून गेला. काही वेळाने हरियाणातील शाहबाद येथे त्यांच्या कारला अपघात झाला. या प्रकरणी कुटुंबीयांना कारबाबत माहिती दिल्यानंतर अनसला सेक्टर ३२ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनसची प्रकृती अजूनही नाजूक असून हत्येमागचा हेतू स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अनस बरा झाल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास करणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121