मुस्लिम पक्षकारांना मोठा धक्का! कोर्टाने अखुंदजी मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी नाकारली
09-Apr-2024
Total Views | 90
नवी दिल्ली : अखुंदजी मशिदीत ईदनिमित्त नमाज अदा करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मेहरौलीमध्ये ज्या ठिकाणी अखुंदजी मशीद असायची आणि रमजान महिन्यात 'तरावीह'ची नमाज अदा केली जायची त्या ठिकाणी नमाज पठण करण्याची परवानगी जाण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) या वर्षी दि. ३० जानेवारी रोजी मशीद पाडली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने निर्देश दिले की मुंतझमिया कमिटी मदरसा बेहरूल उलूम आणि कब्रस्तानचे अपील दि. ७ मे रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध असलेल्या संबंधित प्रकरणाशी जोडले जावे. दि. ७ मार्च रोजी ही याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यावर आता ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.
तोपर्यंत रमजान आणि ईदचा कालावधी संपेल, असे सांगून याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला अपीलावर आदेश देण्याची विनंती केली, परंतु उच्च न्यायालयाने या टप्प्यावर या प्रकरणात कोणताही अंतरिम आदेश दिलेला नाही, असे सांगितले. , विशेषत: जेव्हा एकल न्यायाधीशाने एक महिन्यापूर्वी दिलासा देण्यास नकार दिला होता.
दरम्यान, हायकोर्टाने दि. २३ फेब्रुवारीच्या आदेशाचीही दखल घेतली, यापूर्वी या अर्जात 'शब-ए-बारात' निमित्त मशिदीच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कबरीवर नमाज अदा करण्याची परवानगी मागितली होती. उल्लेखनीय आहे की ६०० वर्षांहून अधिक जुनी मानली जाणारी अखुंदजी मशीद तसेच तेथील बहरुल उलूम मदरसा यांना संजय वनातील बेकायदेशीर बांधकाम घोषित करण्यात आले होते आणि दि. ३० जानेवारी रोजी दिल्ली विकास प्राधिकरणाने त्या पाडल्या होत्या.