“पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही”, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

    22-Apr-2024
Total Views | 120
अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि नेहा जोशी मांडलेकर यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळं सातत्यानं सामोरं जावं लागण्याऱ्या टीकांमुळे अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे.
 

chinmay mandalekar 
 
मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या लिलया पेलणारे चिन्मय मांडलकेर (Chinmay Mandalekar) यांनी आजवर ६ चित्रपटांतून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आहे. परंतु, सोशल मिडियावर चिन्मय यांच्या मुलाचे नाव जहांगीर का आहे? यावरुन झालेल्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ देखील त्यांनी (Chinmay Mandalekar) सोशल मिडियावर शेअर केला आहे.
 
चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाचं नाव जहांगीर असल्यानं त्यांना पुन्हा एकदा लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. परंतु, यावेळी तो मानसिक त्रास त्यांच्या मुलाला आणि पत्नीला झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत चिन्मय मांडलेकर आणि त्यांची पत्नी नेहा यांना मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात आले. अतिशय असभ्य भाषेतल्या कमेंट्स पाहून चिन्मय आणि नेहा यांनी अनेकदा यावर भाष्य केले होते. पण कुटुंबाला होणारा मानसिक त्रास लक्षात घेता चिन्मयने हा मोठा निर्णय घेतला आहे.
 
 
chinmay mandalekar
 
काय म्हटले चिन्मय यांनी व्हिडिओमध्ये?
 
“छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो, असं चिन्मयनं त्याच्या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. मी लेखक, दिग्दर्शक , अभिनेता अशा अनेक भूमिका पार पडल्या. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. पण माझ्या मुलाचं नाव जहांगिर आहे म्हणून आम्हाला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जातंय. एक व्यक्ती म्हणून मला त्याच्या खूप त्रास होतोय . माझ्या कुटुंबियांना अशा पद्धतीचा मानसिक त्रास होणार असेल तर, मी आज नम्रपणे सांगतो की, इथून पुढं मी ही भूमिका करणार नाही. मी आज पर्यंत सहा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, पण आता नाही. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो”. असे चिन्मयने स्पष्ट केले आहे.
 
चिन्मय भविष्यात शिवराय साकारणार नसल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराला आणि त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे. परंतु, कलाकाराला त्याचे वैयक्तिक जीवन नसूच शकते का? यावर या ट्रोलिंगमुळे खरंच मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121