जग शुद्ध होण्यासाठी...

    16-Apr-2024   
Total Views | 90
 
Riddhi Patel
 
तुम्ही इस्रायलला विरोध करा. आज येशू असता, तर त्यानेच तुम्हाला मारून टाकले असते. एक दिवस गिलोटिन येईल आणि तुमच्या सगळ्यांचे गळे कापेल. तुमच्या घरी भेटून तुमचा खातमा करू!” असे ती नगरपरिषदेच्या सभेत म्हणाली. ही घटना आहे, अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची. असे म्हणणारी ती हिंदूद्वेष्टी आणि पॅलेस्टाईन समर्थक रिद्धी पटेल. मात्र, आता तिची पोपटपंची गायब झाली असून आता ती रडत-भेकत आहे. कारण, खुनाची धमकी देणे, दहशतवादाचे समर्थन करणे, यासाठी तिच्यावर १६ गुन्हे दाखल झाले.
 
कॅलिफोर्नियामधील बेकर्सफील्ड नगरपरिषदेमध्ये अमेरिकेने इस्रायलला समर्थन द्यावे की देऊ नये, या विषयावर इथे चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये महापौर करेन गोह आणि नगरपरिषदेचे सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये अमेरिकेने इस्रायलला अजिबात समर्थन करू नये तसेच पॅलेस्टाईनचे समर्थन करावे, यासाठी पॅलेस्टाईन समर्थक तिथे पोहोचले. ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट’ ही संघटना अमेरिकेमध्ये पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍या संघटनेपैकी एक प्रमुख संघटना. या संघटनेचे लोक तिथे पोहोचले होते. त्यांनी इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन समर्थनाचा मुद्दा मांडला. त्यांच्या मुद्द्यांचे समर्थन करत या रिद्धीने बोलायला सुरुवात केली. पण, हे समर्थन म्हणजे दहशतवाद, हिंसा आणि हिंदू तसेच इस्रायलविरोधातला द्वेष आणि मत्सरच होता. त्यावेळी रिद्धी पटेल हिने महापौर आणि सदस्यांना धमकी दिली.
 
या सभास्थानी येणार्‍यांची मेटल डिटेक्टकर तपासणी केली जात होती. तसेच पोलिसांचा बंदोबस्तही होता. रिद्धीने या सगळ्यांना विरोध केला का? तर म्हणे, यातून नगरपरिषदेने पॅलेस्टाईन समर्थकांना दहशतवादी गुन्हेगार ठरवायचे होते. नगरपरिषदेचे महापौर करेन गोह आणि सर्वच सदस्यांनी इस्रायलचा विरोध करायलाच पाहिजे, अशी तिने धमकी दिली. तसे केले नाही, तर त्यांचा जीव घेतला जाईल, असेही ती म्हणाली. बरं, यामध्ये सध्या सुरू असलेला चैत्र नवरात्री उत्सव आणि हिंदूंबद्दलही ती काहीबाही बरळली. ती म्हणाली, “नवरात्रोत्सव सुरू आहे आणि तो आता जगभरात साजरा होतो. पण, नवरात्रोत्सव साजरा करणारे हे (म्हणजे हिंदू) पीडित लोकांवर अत्याचार करणारे लोक आहेत.” रिद्धी पटेल ही अत्यंत गलिच्छ, विकृत मानसिकतेची आणि हिंदूद्वेष्टी महिला आहे, हे तिने याआधीही दाखवून दिले होतेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप तसेच हिंदूंविरोधात तिने यापूर्वीही अपशब्द वापरले होते.
 
पटेल नावाची भारतीय महिला नरेंद्र मोदींच्या आणि हिंदूंच्या विरोधात बोलली, म्हणून तमाम हिंदूद्वेष्टे कमाल आनंदी झाले. पण, ‘हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार’ या न्यायाने त्यावेळी हिंदू समाजाने तिला दुर्लक्षितच केले. पण, आता कॅलिफोर्नियाच्या नगरपरिषदेमध्ये तिने पुन्हा गरळ ओकलीच. तिच्यावर कारवाईही झाली. सभेमध्ये आपण मोठे लढवय्ये, योद्धा, न्यायप्रवर्तक वगैरे वगैरेच्या गैरसमजुतीतून तिने तिथे सगळ्यांना धमकी दिली. मात्र, शिक्षा सुनावली गेल्यावर भेकड आणि तोंडाची वाफ दवडणारी ती मुळुमुळु रडायला लागली. का? कारण, तिच्यावर एकाच वेळी १६ गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्यांसंदर्भातले भक्कम पुरावेही नगरपरिषदेकडे आहेत. तिच्यावर गुन्हा दाखल होताच ती जिथे ‘इकोनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्डिनेटर’ म्हणून काम करायची, त्या ‘सेंटर फॉर रेस’, ‘पॉवर्टी अ‍ॅण्ड द एनव्हार्यन्मेंट’संस्थेने तिला लगेच कामावरून काढून टाकले. तसेच तिच्या वक्तव्याचा आणि वृत्तीचाही निषेध केला.
 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, इस्रायल विरोध आणि पॅलेस्टाईन समर्थन करणार्‍या ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट’ या संस्थेनेही रिद्धी पटेलचा निषेध केला. संघटना रिद्धीच्या हिंसक वक्तव्यांशी सहमत नाही. तिचे विधान अत्यंत चुकीचे आहे, असे या संघटनेने जाहीर केले. हे कमी की काय म्हणून, इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन समर्थक असलेल्या बहुतेक सर्वच आंदोलकांनी रिद्धीचे समर्थन तर केले नाहीच, उलट तिच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली. एकंदर रिद्धी एकटी पडली. तिला असे वाटले होते की, अमेरिकेमध्ये नव्हे, जगभरात पॅलेस्टाईन समर्थक संघटना -लोक आहेत, जे तिला समर्थन देतील, तिला डोक्यावरही घेतील. पण, कसले काय? विकृत मानसिकतेचे आणि अविचारांचे योग्य फळ तिला मिळाले. रिद्धीसारखे लोक जगभरात असतात, आपल्या भारतात काय कमी आहेत? या लोकांवर दयामाया न दाखवता कारवाई झाली, तरच जग थोडेतरी शुद्ध होईल,असे वाटते.
 
                                                                                                                                                   - ९५९४९६९६३८
 
 
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121