स्मार्ट पार्किंगचे जागतिक धोरण

    21-Jun-2025
Total Views |
 
Global strategy for smart parking
 
जगभरातील शहरांमध्ये पार्किंगची जागा शोधण्यात नागरिक बराच वेळ घालवतात. उदाहरणार्थ, लंडनमधील सरासरी वाहन चालक दरवर्षी पार्किंगची जागा शोधण्यात सुमारे 67 तास घालवतो. परंतु, पार्किंगची जागा शोधण्यात फक्त वेळच वाया जात नाही, तर ती वेळ मोठ्याप्रमाणावर इंधनदेखील जाळते. यामुळे वातावरणात जास्त हरितगृह वायू उत्सर्जित होतात आणि वाहनचालकांना इंधनाचा अनावश्यक तोटा सहन करावा लागतो. न्यूयॉर्कमधील सरासरी चालक दरवर्षी सुमारे 143.5 लीटर इंधन वापरतो आणि सुमारे 317 किलो कार्बन उत्सर्जित करतो.
 
हे रोखण्यासाठी आज जगभरातील शहरांत अधिकाधिक ‘स्मार्ट पार्किंग प्रणाली’ राबविण्यात येत आहेत. या प्रणाली गर्दी, प्रदूषण आणि इमारतींच्या दाटीवाटीच्या क्षेत्रात पार्किंगची व्यवस्था नसणे यांसारख्या शहरी समस्या कमी करण्यास मदत करतात. ‘स्मार्ट पार्किंग’ची बाजारपेठ 2030 सालापर्यंत 25.2 टक्क्यांच्या 12.9 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढणार आहे, असे जागतिक अंदाज आहेत. यातूनच आगामी काळात ‘स्मार्ट पार्किंग प्रणालीं’चा प्रभाव अधोरेखित होतो. ‘स्मार्ट पार्किंग’ ही संज्ञा एका अत्याधुनिक प्रणालीचे वर्णन करते, जी कॅमेरे, सेन्सर्स, ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) आणि मोबाईल अ‍ॅप्ससह विविध तंत्रज्ञानाचा वापर करून महानगरांमध्ये पार्किंग स्पॉट्सचे प्रभावीपणे व्यवस्थापन करते आणि त्यांचा वापर जास्तीत जास्त करते. पार्किंग शोधताना आणि वाहनचालकांना थेट उपलब्ध जागांकडे घेऊन जाताना ही प्रणाली पार्किंग उपलब्धतेवर रिअल-टाईम डेटाही उपलब्ध करून देते, ज्यामुळे वाहतुककोंडी टाळली जाते. ‘स्मार्ट पार्किंग’चे उद्दिष्ट डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शहरी परिसर अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि वापरकर्ता अनुकूल बनवणे आहे.
 
शहरातील वाहतुकीच्या सुमारे 30 टक्के वाहतुककोंडी आणि पर्यावरणीय प्रदूषण जास्त गर्दीमुळे होते. जागतिक अभ्यासानुसार, ‘स्मार्ट पार्किंग’ सिस्टम लागू केल्याने पार्किंगची जागा शोधण्यासाठी लागणारा वेळ 43 टक्के कमी झाला आहे. वाहतूक प्रवाह सुधारला आहे. यातूनच हरितगृह वायू उत्सर्जन कमी झाले आहे. ‘स्मार्ट पार्किंग’ सिस्टम कार उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी करतात. जर या पद्धती लागू केल्या गेल्या, तर प्रमुख शहरे त्यांचे वार्षिक कार्बन उत्सर्जन लाखो किलोग्रॅमने कमी करू शकतात.
स्मार्ट शहरांच्या विकासामुळे सरकारांना या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी ‘स्मार्ट पार्किंग’सारख्या क्षेत्राला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी आणि ब्राझीलसारख्या विविध देशांची सरकारे ‘स्मार्ट सिटी प्रकल्प योजना’ वेगाने राबवित आहे, ज्यामुळे ‘स्मार्ट पार्किंग’ सिस्टम मार्केटसाठी अनुकूल दृष्टिकोन निर्माण होत आहे. उदाहरणार्थ, ऑक्टोबर 2022 साली इंडोनेशियातील गुंतवणूक आणि बांधकाम कंपनी, ‘पीटीपीपी (पर्सेरो) टीबीके’ने दक्षिण कोरियातील ‘एलजी सीएनएस’सोबत भागीदारी करून इंडोनेशियाच्या नवीन राजधानी नुसंतारा येथे ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’ची योजना आखली. पार्किंग व्यवस्थापन सुधारणे, यातूनच वायू प्रदूषण आणि वाहतुककोंडी कमी करण्यावर प्रादेशिक सरकारांचे लक्ष वाढत असल्याने ‘आशिया पॅसिफिक स्मार्ट पार्किंग सिस्टम’ मार्केट 25.4 टक्के विस्तारण्याचा अंदाज आहे.
 
शिवाय, जागतिक बाजारपेठेतील या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू आणि वाढत्या स्टार्टअप्सचा लक्षणीय प्रवेश ‘आशिया पॅसिफिक स्मार्ट पार्किंग सिस्टम’ मार्केटला चालना देईल, अशी अपेक्षा आहे. 2022 साली ‘जागतिक स्मार्ट पार्किंग सिस्टम’ बाजारपेठेत उत्तर अमेरिकेचा वाटा 35 टक्क्यांपेक्षा जास्त होता. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे 2030 सालापर्यंत ‘प्रादेशिक स्मार्ट पार्किंग सिस्टम’ बाजारपेठ वाढण्याची अपेक्षा आहे. वाढत्या वाहतुककोंडीमुळे उत्तर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये ‘स्मार्ट पार्किंग सोल्यूशन्स’ सादर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक-खासगी सहकार्याने प्रकल्प हाती घेण्यात आले. ‘स्मार्ट पार्किंग’ फायद्यांबाबत जागरूकतेचा अभाव हा अंदाज कालावधीत बाजाराच्या वाढीतील मुख्य अडथळा आहे. मात्र, वायरलेस आणि डिजिटल पेमेंट तंत्रज्ञानातील प्रगतीसह ‘ऑटोमेटेड पार्किंग सोल्यूशन्स इंटिग्रेशन’मध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे बाजाराच्या वाढीला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.