मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळालेल्या नर बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. ( pune leopard resuced ) पुणे पालिका प्रशासनाने वन विभागाच्या मदतीने या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. ( pune leopard resuced ) ४८ तासानंतर ही कामगिरी फत्ते झाली. ( pune leopard resuced )
सोमवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हा नर बिबट्या पिंजरा तोडून पळाला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुणे पालिका प्रशासनाने वनविभाग आणि पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टशी संपर्क साधला. मंगळवार दि. ५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या प्राणिसंग्रहालयातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसला. त्यामुळे तो प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रेस्क्यू टीमने याठिकाणी नऊ पिंजरे लावले. यातील एका पिजंरामध्ये हा बिबट्या जेरबंद झाला.
साधारण ७ ते ८ वर्ष वयाचा हा नर बिबट्या असून तो पिंजरा तोडून पळाला असल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, पिंजऱ्याच्या परिस्थितीचे निरीक्षण केल्यास पिंजरा तुटल्याची शक्यता दुरापास्त आहे अशी माहिती मिळाली आहे. या बिबट्याला काही महिन्यांपूर्वीच हंपी येथील प्राणिसंग्रहालयातून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते.