सातारा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे. साताऱ्याच्या वाईजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री रामदास आठवलेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरुप असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास आठवले हे वाईवरून मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने रामदास आठवले सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.