शेअर बाजार झलक: सकाळी कमावले दुपारी गमावले ! अखेरच्या सत्रात शेअर बाजारात किंचित घसरण

शेअर बाजार तज्ञांचे भाकीत खरे ठरले! सेन्सेक्स ७३१४२.८० पातळीवर पोहोचला, बीएसी बँक निर्देशांक ५३१९५.३९ पातळीवर

    23-Feb-2024
Total Views | 46

stock market
 
 
मोहित सोमण
 

मुंबई: आज सकाळी शेअर बाजार तज्ञांचे भाकीत खरे ठरले आहे. आज सकाळच्या सत्रात भाववाढीच्या नंतरही तज्ज्ञांनी बाजार वरकरणी वधारले असूनही गुंतवणूकदारांनी दक्षता घेण्याची गरज आहे. आज त्याची परिणती होत सेन्सेक्स निफ्टी मध्ये घसरण झाली आहे. बेंचमार्क निर्देशांकात आज घसरण पहायला मिळत आहे.
 
सेन्सेक्स १५.४४ अंशाने कमी होत ७३१४२.८० पातळीवर पोहोचला आहे. एस पी बीएसी बँक निर्देशांक देखील १५५.८९ अंशाने घसरत ५३१९५.३९ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स दिवसभराच्या सत्रात ७३४३.९३ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, टायटन, एम अँड एम, रिलायन्स, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स या शेअर्स (समभागात) चे मूल्य वधारले. पॉवर ग्रीड, कोटक बँक,आयसीआयसीआय बँक भारती एअरटेल, मारूती, जेएसडब्लू स्टील या समभागात घसरण झाली.
 
अखेरच्या सत्रात ४.७५ अंशाने घसरत निफ्टी निर्देशांक २२२१२.७० पातळीवर पोहोचला. दिवसभरात निफ्टीचा निर्देशांकांचा उच्चांक २२२९७.५० पातळीवर होता. निफ्टीत एकूण २० कंपन्यांच्या समभागात वाढ झाली असून ३० कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे. मात्र निफ्टी मिडकॅप सिलेक्ट १५४.७५ अंशाने वाढत ५९१५३.७५ पातळीवर पोहोचला परंतु निफ्टी बँक मात्र १०८.०५ अंशाने घसरत ४६८११.७५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी फायनान्सशियल सेवा निर्देशांकातही वाढ झाली आहे. ही वाढ ११.२० अंशाने होत २०६६७.१० पातळीवर पोहोचला. निफ्टीत बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाईफ, एचडीएफसी बँक, डॉ रेड्डीज या समभागात वाढ झाली व बीपीसीएल, एचसीएलटेक, मारूती, एशियन पेटंस, ओएनजीसी या समभागात घसरण झाली.
 
अखेरच्या सत्रात मेटल, आयटी समभागात घसरण झाली असल्याने याचा फटका काही अंशाने शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बसला. विशेषतः जीओ फायनांशियल सर्विसेस समभाग तब्बल १४ टक्क्याने वाढून त्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन २ लाख करोड पार झालेले आहे. आज सर्वाधिक फायदा फार्मा सेक्टरमधील समभागावर झाला. फार्माशिवाय, सकाळप्रमाणे मिडिया कंपनीचे समभाग तेजीत राहिले. आज सर्वाधिक फटका मात्र सकाळप्रमाणेच पीएसयु (पब्लिक सेक्टर युनिट) बँकांना अखेरच्या सत्रात बसला आहे. डॉ रेड्डीज सिप्ला, मारूती सुझुकी यांच्या सहभागाने ५२ आठवड्यातील सर्वाधिक निर्देशांकांची नोंदणी केली. पीएसयुशिवाय आयटी, एनर्जी समभागावर तोटा सहन करावा लागला आहे.
 
आजच्या शेअर बाजारावर मुंबई तरूण भारतशी भाष्य करताना, ' शुक्रवारी बाजारांनी मोकळा श्वास घेत मिश्र संकेतांदरम्यान जवळजवळ बाजारात कुठलाही बदल झालेला न होत.संपले. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी शेवटपर्यंत आकुंचित श्रेणीत फिरून शेवटी 22,212.70 स्तरांवर स्थिरावला. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र ट्रेंडने व्यापाऱ्यांना वेठीस धरले. विशेषतः रियल्टी आणि फार्मा वाढले तर मेटल आणि आयटी लाल रंगात बंद झाले. विस्तीर्ण निर्देशांकही सुस्त झाले आणि किरकोळ वाढले.
 
चालू ठेवण्यासाठी संकेत प्रचलित अपट्रेंडच्या बाजूने आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांनी दर्जेदार स्टॉक जोडण्यासाठी इंटरमीडिएट डिप्सचा वापर करावा. विशेषत: यूएस, आणि गतीच्या संकेतांसाठी बँकिंग क्षेत्रातील प्रमुखांचा सहभाग असताना गुंतवणूकदारांनी जागतिक निर्देशांकांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे ' अशा भावना रेलिगेअर ब्रोकिंग कंपनीचे टेक्निकल रिसर्च एसव्हीपी अजित मिश्रा यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121